*गोंदिया जिल्ह्यातील सरांडी गावातील दुर्दैवी घटना*
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सरांडी गावात एक दुखद घटना घडली आहे. घरगुती विहिरीतील मोटार पंप दुरस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या एकाचा जीव वाचवतांना चौघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खेमराज साठवणे, सचिन भोंगाडे, प्रकाश भोंगाडे व महेंद्र राऊत अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खेमराज साठवणे यांच्या घरी असलेल्या विहीरीच्या विद्युत पंपाची दुरुस्ती करण्यासाठी साठवणे हे विहिरीत उतरले. मात्र, वीज प्रवाह सुरू झाल्याने साटवणे यांचा विहीरीतच मृत्यू झाला. ते बराच वेळ विहिरी बाहेर न आल्याने सचिन भोंगाडे खाली उतरले. त्यांना वाचविण्याकरता प्रकाश भोंगाडे व महेंद्र राऊत देखील उतरले असता विजेचा शॉक लागून दोघांचाही विहिरीतच मृत्यू झाला. या घटनेमुळं सरांडी गावावर शोककळा पसरली आहे.
मोटार सुरु होत नसल्यानं खेमराज साठवणे विहिरीत उतरले होते. विहिरीत उतरल्यानंतर सर्वात प्रथम त्यांना विजेचा धक्का लागला. त्यांच्या पाठोपाठ विहिरीत उतरलेल्या सचिन भोंगाडे, प्रकाश भोंगाडे आणि महेंद्र राऊत यांना देखील विजेचा तीव्र धक्का लागला. यात चौघांना जीव गेल्याने सरांडी गावांवर शोककळा पसरली आहे.
0 Comments