शिवसेनेच्या दणक्याने दुसऱ्याच दिवशी बँकेची लिंक सुरू: शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार
मुल: प्रतिनिधी
तालुक्यातील बेंबाळ येथे असलेल्या बँक ऑफ इंडिया च्या शाखेत मागील पंधरा दिवसापासून लिंक नसल्यामुळे ग्राहकांना, शेतकऱ्यांना, बचत गट महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
दररोज बँकेत जाऊन शेतकरी व महिलांना रिकाम्या हाताने परत येण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. ही बाब लक्षात घेऊन नांदगाव येथील शिवसेना कार्यकर्ते मधुकर झुंगाजी पवार, व जीवनदास गेडाम,शिवसेना उपतालुकाप्रमुख पोंभुर्णा यांनी कार्यकर्त्यांना घेऊन, व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिर्हे यांच्याशी बातचीत करून बँकेत धडक दिली.
पंधरा दिवसापासून लिंक बंद असल्याचे कारण शाखा व्यवस्थापकांना विचारण्यात आले. शाखा व्यवस्थापकांनी तात्काळ सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन देऊन लगेच दुसऱ्या दिवशीच लिंक सुरू करून सेवा सुरळीत केली.
बँकेत ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची व पावसाळ्याच्या दिवसात ग्राहकांना उभे राहण्यासाठी किंवा आसरा घेण्यासाठी छावणी करण्याची सूचना शिवसैनिकांनी शाखा व्यवस्थापक श्री लांजेवार यांना केली. त्यांनी सकारात्मक उत्तर देऊन सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. बँकेची लिंक लगेच दुसऱ्या दिवशीच सुरू झाल्यामुळे ग्राहकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिर्हे व शिवसेना कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
0 Comments