Ticker

6/recent/ticker-posts

MPSC च्या विद्यार्थिनी वर कोयत्याने हल्ला, पुण्यातील खळबळ जनक घटना



MPSC च्या विद्यार्थिनी वर कोयत्याने हल्ला, पुण्यातील खळबळ जनक घटना
 
पुणे : पुण्यातील दर्शना पवार हत्याकांडानं राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दर्शनाचा मित्राला अटक करण्यात आली आहे. या घटनेला आठवडा उलटत नाही तोच पुन्हा पुण्यात एमपीएससी करणाऱ्यावर तरुणीवर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी काही तरुणांनी वेळीच धाव घेतल्यानं तरुणीचा जीव वाचला आहे.

 नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात एमपीएससी क्लासेस असलेल्या भागात ही घटना घटली आहे. पिडित तरुणी ही आज सकाळच्या सुमारास क्लासला गेली होती. परत येताना अचानक मागून येत एका तुरुणाने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. कोयता तिच्या हाताला लागल्याने ती ओरडली आणि स्वताला वाचविण्यासाठी तीने आरडाओरडा सुरु केला. दरम्यान तिचा आवाज ऐकून परिसरात असलेल्या काही तरुणांनी तिच्या दिशेने धाव घेत तिला वाचवले.

Post a Comment

0 Comments