अखिल भाऊ गांगरेडीवार यांची केळझर-चिचाळा जि.प. क्षेत्रात भाजपाकडून प्रबळ दावेदारी
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
मूल तालुका : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची आचारसंहिता काही दिवसांत लागू होण्याची शक्यता असून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मूल तालुक्यातील केळझर-चिचाळा जिल्हा परिषद क्षेत्रातून भेजगावचे विद्यमान सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय अखिल भाऊ गांगरेडीवार यांची भाजपातर्फे उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा जोरदार आहे.
अखिल भाऊ हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस कार्यकर्ता. युवा नेतृत्वातून त्यांनी गोरगरिबांचे व शेतकरी हिताचे अनेक प्रश्न सोडवत गावागावात विश्वास संपादन केला. मात्र मागील विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेसच्या धोरणाला कंटाळून सुधीर भाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात जाहीर प्रवेश केला.
भाजपात प्रवेशानंतरही अखिल भाऊंनी जनसेवा, शेतकरी कल्याण व स्थानिक विकासाचे ध्येय कायम राखले. अनेक वर्षे सरपंच म्हणून कार्य करताना त्यांनी प्रशासन व गावकऱ्यांमध्ये दुवा साधत निराधार, वंचित व सामान्य नागरिकांचा भक्कम आधार मिळवला आहे. तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांचे प्रश्न ‘चुटकीसरशी’ सोडवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ झाली आहे.
या सर्व कार्याचा परीणाम म्हणून केळझर-चिचाळा जिप क्षेत्रात त्यांची जनाधार मजबूत असल्याचे अलीकडील सर्वेक्षणात दिसून आले आहे. “पक्ष कोणताही असो, अखिल भाऊ मैदानात उतरले तर आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू,” अशी भावना कार्यकर्त्यांपासून ते ग्रामस्थांतही व्यक्त होत आहे.
येत्या निवडणुकीत अखिल भाऊंच्या विरोधात तगडा उमेदवार कोणास उभे केले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र एवढे मात्र निश्चित…
या वेळी केळझर-चिचाळा जिप क्षेत्रातील लढत काट्याची होणार असून विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल…!





0 टिप्पण्या
Thanks for reading