पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी
आज सकाळपासूनच पावसाच्या सरी सुरू होत्या मात्र साडेदहा च्या नंतर मुसळधार पावसाची सुरुवात झाली. या पावसामुळे अनेकांच्या घराची गळती सुरू आहे तर जळगाव येथील नागरिक भास्कर गेडाम यांच्या झोपडी वजा घरात पावसाचे पाणी साचले असून हा त्यांचा दरवर्षीचाच वनवास आहे. मात्र त्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याने दरवर्षी घरात पाणी असतानाच पाण्यातच वास्तव्य करावे लागत आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading