सावली :
महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मीक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सावली या कार्यालयाच्या वतीने दि. १९ मे 2023 रोजी १० वाजता पंचायत समीती सभागृह सावली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांना शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रम तहसीलदार सावली यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे. महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच शासकीय यंत्रणेकडून महिलांच्या अडचणींची सोडवणुक करून महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा मिळावी या उद्देश पूर्ती करिता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर शिबिरास, तहसील कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीसठाणे, शिक्षणाधिकारी (गट), विधी सेवा प्राधिकरण, तालुका कृषी विभाग, भुमी अभिलेख, पशुसंवर्धन, समाजकल्याण, उमेद प्रकल्प, मनरेगा आदी विभागीय कार्यालयातील अधिकारी मार्गदर्शन करतील. सदर कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन शासन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती घ्यावी तसेच आपल्या प्रश्नांचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सावली यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
0 Comments