वृत्तसंस्था: नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटी देशाच्या अर्थव्यवस्थेत अनागोंदी माजली आहे. केवळ अर्थव्यवस्थेबाबतच नाही तर अनेक आघाड्यांवर पंतप्रधान मोदी अकार्यक्षम ठरले आहेत असा हल्लाबोल केंद्रीय अर्थमंत्री सितारामन यांचे पती डॉक्टर परकला प्रभाकर यांनी केला आहे.
डॉक्टर परकला प्रभाकर यांनी "द क्राकड टिंबर ऑफ न्यू इंडिया: एसेज आन द रिपब्लिक इन क्ल्रायसेस"हे नवे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी मोदी सरकारच्या कारभाराची अक्षरशः चिरफाड केली आहे. सरकार आणि भाजपकडून केले जाणारे दावे , वादे किती फोल आहेत केवळ प्रचारकी आहेत! याचा उहापोहो डॉक्टर प्रभाकर यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी"द वायर"या संकेतस्थळाच्या युट्युब चॅनलला डॉक्टर परकला प्रभाकर यांची मुलाखत घेतली आहे.
_____________________
समाजात फूट पाडण्यासाठी मोदी "कार्यक्षम"प्रधानमंत्री आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक बाबतीत अकार्यक्षम असले तरी काही बाबतीत कार्यक्षम आहेत. समाजात फूट पाडणे, जातीय द्वेष निर्माण होईल असे वातावरण निर्माण करणे याबाबत मोदी "कार्यक्षम" आहेत. असा सनसनित टोला डॉक्टर परकला प्रभाकर यांनी लगावला आहे. त्यामुळे भाजप गोटात आणि सरकारमध्ये एकच खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.
0 Comments