Ticker

6/recent/ticker-posts

*नागभीड येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय व्हावे* *नागभीड तालुका बार असोसिएशनची मागणी*



अरुण रामुजी भोले
नागभीड (तालुका प्रतिनिधी) : 
       काही वर्षांपूर्वी ब्रह्मपुरी येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय व्हावे अशी मागणी ब्रह्मपुरी तालुका बार असोसिएशनच्या वतीने नागभीड व सिंदेवाही यांचे मदतीने करण्यात आली होती, परंतु आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत न झाल्याने मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे ब्रह्मपुरी आणि सिंदेवाहीच्या मध्ये असलेल्या नागभीड शहरात जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाची न्यायालय व्हावे अशी नव्याने मागणी नागभीड तालुका बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
नागभीड, ब्रह्मपुरी आणि सिंदेवाही येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय आहे. त्यानंतरचे सर्व न्यायालयीन कामे करण्याकरिता शंभर ते सव्वाशे किलोमीटर अंतरावरील चंद्रपूर येथे जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. ब्रह्मपुरी,आणि सिंदेवाही येथील नागरिकांना वेळोवेळी चंद्रपूरला जाणे अडचणीचे ठरते.
त्यामुळेच ब्रह्मपुरी किंवा नागभीड येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय व्हावे अशी मागणी तिन्ही तालुका बार असोसिएशनची होती. त्यामुळे तिन तालुक्यांपैकी ब्रह्मपुरी तालुका असोसिएशन बारच्या वतीने ब्रह्मपुरी येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय व्हावे अशी मागणी केली होती. या मागणीला नागभीड व सिंदेवाही येथील तालुका बार असोसिएशनच्या वतीने पाठिंबा देण्यात आलेला होता. त्यामुळे ब्रह्मपुरीत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय झाल्यास तिन्ही तालुक्यांना सोयीचे होणार होते.
 याच अनुषंगाने अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकरीता नागभीड, सिंदेवाही व ब्रम्हपूरी येथील बार असोसिएशनची एक बैठक नागभिड तालुक्यातील घोडाझरी येथे घेण्यात आली होती. यावेळी काॅमन ठराव पारीत करण्यात आला होता. त्या ठरावात ब्रम्हपरी किंवा नागभीड येथे न्यायालयाकरीता मागणी करावी. तिन्ही तालुका बार असोसिएशनचा काहीही आक्षेप घेणार नाहीत असे ठरले. ब्रम्हपरी येथे न्यायालयाकरीता ब्रम्हपुरी बार असोसिएशन ने मागणी केली. मात्र काही योग्य कागदपत्राअभावी ती मागणी शासनाने नाकारली. त्यामुळे नागभीड बार असोसिएशन च्या वतीने नागभिड येथे न्यायालय व्हावे अशी मागणी करण्यात आली. ब्रह्मपुरीत न्यायालयाची मागणी पुढे न गेल्याने आता नागभिड बार असोसिएशनच्या वतीने ब्रह्मपुरी बार असोसिएशनला सहकार्य करण्यास विनंती करण्यात आली. परंतू त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. मात्र सिंदेवाही बार असोसिएशनने नागभिड मध्ये न्यायालय व्हावे याकरिता पाठिंबा दिला आहे. त्यांनी नाहरकत दिले. त्यामुळे न्यायालयाचे मागणी करीता आवश्यक सर्व कागदपत्रे, कोर्टातील केसेस व अन्य कागदपत्रे तयार करून शासन, जिल्हा, हायकोर्ट मध्ये काही वर्षांपूर्वी मागणी केली. परंतु मागणी अजूनही शासन दरबारी पडून आहे. मागणी पूर्ण होण्यास विलंब झाल्याने मुंबई हायकोर्टात रिट पिटीशन दाखली करण्यात आली. रिट पिटीशन मध्ये जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय देण्याची मागणी केली. त्यानंतर कोरोना लागला. यावेळी मागणी प्रलंबित राहिली. सध्या हायकोर्टात केस प्रलंबित आहे. ब्रम्हपूरी येथे इमारत झाल्यामुळे पुन्हा मागणी करण्यात आली आहे. परंतू ज्या ठिकाणी मागणी नाकारली आहे. त्या ठिकाणी न्यायालय असे होवू शकते,असा प्रश्न नागभिड बार असोसिएशनने उपस्थित केला आहे. ब्रम्हपूरीत न्यायालयाकरीता आम्ही सहकार्य केल्यामुळे त्यांनी आम्हांला सहकार्य करणे आवश्यक होते परंतू त्यांनी केले नाही,असा आरोप ही केला आहे. ब्रम्हपूरीत न्यायालय न झाल्याने नागभीड येतथे अतिरिकत् जिल्हा सत्र न्यायालाची मागणी करण्यात आली आहे. नागभीड येथील मागणी ही वास्तव्यवादी आहे. सर्वांच्या सोयीची आहे. तसेच न्यायालयात केस प्रलंबित आहे. न्यायालयाचे निकाल नागभिड बार असोसिएशनला बाजूने लागून नागभिड मध्ये न्यायालय मंजूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. पुन्हा नागभीड शहरात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments