अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
नागभिड---काँग्रेसचे जेष्ठ नेते जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री.संतोषजी रावत यांच्यावर दोन दिवसापुर्वी मुल येथे गोळीबार करण्यात आली होती. सदर घटना ही जिवित हाणीची असुन आरोपींना लवकरात लवकर पकडून अटक करण्यात यावी.अन्यथा येत्या दोन दिवसांत तालुका काँग्रेस कमेटी रस्त्यावर उतरून निर्देशन व आंदोलन करण्यात येईल.
यासाठी आज दिनांक १४/०५/ २०२३ ला नागभीड तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने पोलीस स्टेशन नागभीड येथे निवेदन देण्यात आले. यावेळी नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी,नागभीड शहर अध्यक्ष रृमेशभाऊ ठाकरे,सेवादल अध्यक्ष डाँ.रविंद्रजी कावळे,नागभीड ता.काँ.उपाध्यक्ष रविंद्रजी बळी,शहर युवक काँग्रेस अध्यक्ष महेशभाऊ कुर्झेकर,माजी नगरसेवक दिनेशभाऊ गावंडे,प्रतिकभाऊ भसीन,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष तबरेजभाई शेख,माजी चिमुर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विजयभाऊ अमृतकर,मधुभाऊ बावणकर,हरिषभाऊ मुळे,प्रशांतभाऊ गेडाम,संकेतभाऊ वारजूकर,राजेशभाऊ झाल्लरवार, नंदु सातपैसे, तसेच काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments