Ticker

6/recent/ticker-posts

जन्मदात्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ नगरसेवक युवकाने सुरू केली पाणपोई



पोंभूर्णा :- उन्हाच्या उकाड्याने सर्व नागरिक त्रस्त आहेत. तापमान ४४ अंशावर गेले आहे.पोंभूर्णा शहरातील बस स्टॅण्ड चौकातील प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे सामाजिक सेवेचा भाव जपत प्रवासी व वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील वर्दळीच्या बस स्टॅण्ड चौकात नगरसेवक दर्शन गोरंटिवार यांनी वडिल स्व.गजानन गोरंटिवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाणपोई सुरू केली आहे.
पाणपोई हा सामाजिक उपक्रम आहे.तहानलेल्यांना पाणी पाजणे हे पुण्याचे काम आहे.उन्हाचा तडाखा दिवसभर जाणवत आहे. पोंभूर्णा शहरात ४४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.गर्मीने नागरिक बेजार होत आहेत.अबालवृद्ध महिला व वयस्कर,प्रवासी,वाटसरू यांना पाण्यासाठी भटकंती करू नये यासाठी सामाजिक बांधिलकीतून व सेवाभाव जपत नगरसेवक दर्शन गोरंटिवार यांनी 
 वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बस स्टॅण्ड चौकात पाणपोई सुरू केली.
यावेळी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल भाऊ संतोषवार, माजी पंचायत समिती सभापती अलका आत्राम,नगरसेवक लक्ष्मण कोडापे,नगरसेवक दर्शन गोरंटिवार,हरिष ढवस, गुरूदास पिपरे,दिलीप मॅकलवार,रजिया कुरेशी,सुनीता मॅकलवार,शारदा कोडापे यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments