सावली: तालुक्यातील खेडी येथे आम्ही अष्टवधान मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक समाजसेवक देवाजी तोफा, सरपंच सचिन काटपल्लीवार,माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, उपसरपंच मुक्ता गडतुलवार, ग्रा.पं.सदस्या शालू अलाम,माया माचेवार,सोमेश्वर कंचावार, परशुराम मर्लावार, पोलीस पाटील कृपाल दुधे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक परमानंद जेंगठे, विवेक दुधे,सुमित्रा कुंभरे, नवनीत कंदलवार,सुजित दंडावार यांची उपस्थिती होती .
समाजसेवक देवाची तोफा यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी देवाजी तोफा यांनी शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.गावाचा विकास करायचे असेल तर सर्वांचे सहकार्य असने गरजेचे आहे.गावविकासासाठी नवनवीन कल्पना राबवली जावीत असे हि ते यावेळी सांगितले.शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्राविण्य मिळवले पाहिजे असा मौलिक सल्लाही यावेळी त्यांनी दिला.शिवजयंती निमित्त मंडळातर्फे सामान्यज्ञान व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.विजयी स्पर्धेकांचा गावातील गुणवत्त विद्यार्थांचा सत्कार प्रमुख अतिथीच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच जिल्हा परिषद शाळा,खेडी येथील शिक्षक नवनीत कंदलवार यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी आम्ही अष्टवधान मंडळातर्फे शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रतीक तुंगीडवार यांनी केले तर प्रस्ताविक आनंद रामटेके व आभार प्रदर्शन श्रीकांत लाटेलवार यांनी केले. कार्यक्रमासाठी अष्टवधान मंडळाचे अध्यक्ष अविनाश गोरंतवार,उपाध्यक्ष अतुल पेंदोर,सचिव शुभम एडनुतलवार, सहसचिव पवन अलाम ,कोषाध्यक्ष खेमाजी कोरेवार, व मंडळाचे सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments