मुल, तालुका प्रतिनिधी
बँक ऑफ इंडिया बेंबाळ येथे अविरत सेवा देणारे, सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे सर्वांचे लाडके आनंदराव जंगलूजी बांबोडे यांचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले.
हसतमुख असणारे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुःख बेंबाळ येथील समाज बांधवांमध्ये व सर्वच समाजातील घटकांमध्ये दिसून येत आहे. त्यांच्या अचानक जाण्याने समाजाची मोठी हानी झाल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रशांत उराडे यांनी आपल्या शोक संवेदनात म्हटले आहे.
0 Comments