Ticker

6/recent/ticker-posts

जि प चे माजी उपाध्यक्ष संदीप करपे यांना ठार मारण्याची धमकी



जि प चे माजी उपाध्यक्ष संदीप करपे यांना ठार मारण्याची धमकी

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

चंद्रपूर:जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संदीप करपे यांना आज अज्ञात इसमाने सुरजागड विरोधात आंदोलन कराल तर अपघातात ठार करू अशी धमकी दिली आहे. त्यामुळे गोंडपिपरी शहरात खळबळ उडाली आहे.येत्या 14 जून रोजी गोंडपिपरीत सुरजागड प्रशासनाविरोधात सर्वपक्षीय आंदोलन होणार आहे. यात संदीप करपे यांची अग्रणी भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर ही धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे. या प्रकाराची तक्रार गोंडपिपरी पोलिसात दाखल करण्यात आली असून पोलिसांनी चौकशीला सुरवात केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवावर उठला आहे. प्रकल्पाच्या वाहणांनी अनेकांचे जीव घेतले आहेत. कायमचे अपगंत्व आल्याने अनेक सामान्यांचे जीवन अंधःकारमय झाले आहे. गेल्या महिनाभरात अपघातांच्या संख्येत मोठी भर पडली. एवढेच नव्हे तर मार्गावरील घरात हायवा घुसला. वारंवार असे गंभीर
प्रकार घडत असतांना अनेकांनी मागणी करूनही प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. यामुळे गोंडपिपरीत या मुद्द्यावर आंदोलन करण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले. या संदर्भात बैठकाही पार पडल्या. यानंतर सुरजागड प्रशासनविरोधात 14 जून रोजी मोठे आंदोलन करण्याची तयारी जोरात सुरु आहे. गोंडपिपरी येथील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संदीप करपे यांनी देखील या आंदोलनाच्या नियोजनात सक्रिय पुढाकार घेतला.

दरम्यान काल (3 जून) रोजी दुपारच्या सुमारास संदीप करपे आपल्या दुकानातून बाहेर मुख्य मार्गावर आले असता बाईकवरून जाणाऱ्या अज्ञात इसमाने सुरजागड च्या विरोधात आंदोलन केले तर अपघात करून ठार मारू अशी धमकी दिली. व पसार झाला. अचानक घडलेल्या या प्रकाराने करपे काही काळासाठी दंग राहिले. दरम्यान धमकी देणाऱ्या बाईकस्वाराला पकडण्याचे प्रयत्न अपयशी ठरले.

सुरजागडआंदोलनात अग्रणी भूमिका घेणाऱ्या करपे यांना धमकी मिळाल्याची माहिती कळताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. या प्रकारानंतर संदीप करपे, बबन निकोडे, शैलेश बैस यांनी ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांची भेट घेत गोंडपिपरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली असल्याची माहिती ठाणेदार हत्तीगोटे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments