Ticker

6/recent/ticker-posts

पोलिसांचा सिने स्टाईल पाठलाग!_ कत्तलखान्यात जाणाऱ्या 41 जनावरांची केली सुटका_ 13 लक्ष 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, गोंडपिपरी पोलिसांची कारवाई



गोंडपिपरी: तालुका प्रतिनिधी

तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गाई बैलांची अवैधरित्या खरेदी विक्री करून त्या जनावरांना तेलंगाना, आंध्रात कत्तल खाण्यात पाठवल्या जाते. हा गोरख धंदा चोरीलपीने अनेक वर्षापासून चालू आहे.

मूल -गोंडपिपरी मार्गावरून वैधरित्या जनावरांना ट्रकमध्ये कोंबून तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती गोंडपिपरी पोलिसांना मिळताच सापळा रचून ट्रकचा पाठलाग केला. व सदर वाहन अडवून तपासणी केली असता ट्रकमध्ये 41 नग मवेशी आढळून आले.


पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन 13 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जनावरांना लोहारा येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे.

गोंडपिपरी चे थानेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या चमूने ही कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध जनावरांची तस्करी करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत.

Post a Comment

0 Comments