नांदेड- भारत देश स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीर, क्रांतीकारक, समाजसुधारक, स्वातंत्र्य सेनानींनी आपापल्या परीने शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करुन देशासाठी मोठे योगदान दिले आहेत. त्यापैकीच एक भारत देश स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते म्हणजे लोकमान्य केशव बाळ गंगाधर टिळक होत असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले.
ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. २३ जुलै २०२३ रविवार रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता थोर समाजसुधारक, जहाल मतवादी, पत्रकार, महान अभ्यासक, तत्त्वज्ञ लोकमान्य केशव बाळ गंगाधर टिळक यांच्या १६७ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
पुढे बोलताना मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, लोकमान्य केशव बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच हे ध्येय उराशी बाळगून केसरी, द मराठा (इंग्रजी) वर्तमानपत्राच्या माध्यमातून व शिवजयंती, गणेश उत्सव अशा उपक्रमांच्या माध्यमातून जनतेला एकत्रित करुन जनजागृती केली. अशा या महान विभूतीचा आपण सर्वांनीच आदर्श घेऊन समाजाप्रती, देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे असेही ते यावेळी म्हणाले.
सर्वप्रथम आगार व्यवस्थापक मा. श्री. आशिष मेश्राम यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 'पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आगाराचे सहाय्यक कार्यशाळा प्रतिमेचे अधीक्षक मा.श्री. संदीप गादेवाड, अशोकराव चव्हाण, वाहतुक निरीक्षक आकाश भिसे, ओमप्रकाश इंगोले, मोबीन मैनोद्दीन शेख, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, पेशवा युवामंच अर्धापूर ता. अध्यक्ष संदीप देशमुख, पत्रकार पवन पाटोळे, पाळी प्रमुख नागोराव पनसवाड, माधवराव सुरेवाड, वाहन परिक्षक हानमंतराव ताटे, नंदकुमार घाटोळ, दयानंद राक्षसमारे, आनंदा कंधारे, अशोक होनमाने, मंगेश झाडे, शिवचरण मळगे, सौ. शिल्पा ढवळे, मीना कदम, प्राजक्ता भालेराव, मालनलबी शेख उस्मान, मनकर्णा आबादार, पांडूरंग बुरकुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मंगेश झाडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी आगारातील कामगार कर्मचारी, बंधु भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments