Ticker

6/recent/ticker-posts

वाघाच्या हल्ल्यात कालवड ठार; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण



वाघाच्या हल्ल्यात कालवड ठार; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण


 पोंभूर्णा:-दरारा 24
          तालुक्यातील ठाणेवासना येथे वाघाने कालवडीवर हमला करून ठार केल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली.या घटनेमुळे येथील नागरिक भयभीत झाले असून वनविभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी दिला आहे. 


 चेकठाणा परिसरात रविवारी दुपारी  डोंगराच्या खाली कक्ष क्र डि ५५४ सी परिसरात गायकी गुरं-ढोरं चारत असतांना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने कडपातील कालवडीवर हल्ला चढवून ठार केले.ठाणेवासना येथील मुर्लीधर कोंडूजी दहिवले यांची हि कालवड असून अंदाजे १५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.या घटनेने ठाणेवासना शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.वनविभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून वाघाचा बंदोबस्त न केल्यास वनविभागाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
 --------------------------
दहा दिवसा अगोदर दीपक गंगाधर पोतराजे, ईश्वर नागापुरे यांच्या बकरीवर वाघाने हल्ला चढवून ठार मारले होते.गावानजीक बाकड मारल्याची हि तीसरी घटना घडली.

Post a Comment

0 Comments