Ticker

6/recent/ticker-posts

अनाधिकृत चोर बिटी कापूस बियाणे भरारी पथकाने केले जप्त -नवेगाव मोरे येथील घटना ; कृषि विभागाची मोठी कार्यवाही


अनाधिकृत चोर बिटी कापूस बियाणे भरारी पथकाने केले जप्त 

-नवेगाव मोरे येथील घटना ; कृषि विभागाची मोठी कार्यवाही 

 पोंभूर्णा :- तालुक्यातील नवेगाव मोरे येथील पडक्या घरात अनाधिकृत चोर बिटी कापूस बियाणे विक्री साठी घरी बाळगले असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून पकडण्यात आले.यात ८०.३० किलोग्रॅम चोर बिटी ज्याचे मुल्य दोन लक्ष तीन हजार सहाशे चाळीस रुपये किंमतीचे बियाणे ताब्यात घेण्यात आले.यामुळे तालुक्यातील चोरबिटी विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.



अनाधिकृत चोर बिटी कापुस बियाण्यास शासनाची परवानगी नाही.मात्र पोंभूर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे येथे छुप्या मार्गाने चोर बिटी बियाणे शेतकऱ्यांना विक्री करून फसवणूक केली जात असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळताच
दि.१५ मे बुधवारला संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान नवेगाव मोरे येथील एका घरात ८०.३० किलोग्रॅम चोर बिटी कापूस बियाणे ज्याचे मुल्य दोन लक्ष तीन हजार सहाशे चाळीस रुपये भरारी पथकाच्या माध्यमातून पकडण्यात आले.व संबंधीत विक्री करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले.नामदेव ढवस (वय ५०),आकाश धानोरकर (वय २९ ) दोघेही रा. नवेगाव मोरे यांचेवर कार्यवाही करण्यात आली.

सदर कार्यवाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर तथा विभागीय कृषी सहसंचालक,नागपूर विभाग शंकर तोटावार, कृषी विकास अधिकारी वीरेंद्र रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली 
तंत्र अधिकारी व गुण नियंत्रण चंद्रशेखर कोल्हे,मोहीम अधिकारी लकेश कटरे,जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक श्रावण बोढे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड,कृषी अधिकारी नितीन धवस,काटेखाये,महेंद्र डाखरे, विवेक उमरे,जुमनाके,
आत्राम,नायगमकर यांनी केली.
--------
चोर बिटी कापूस बियाणे उगवलेच नाही तर शेतकऱ्यांना त्याबाबत दाद मागता येत नाही. त्याचा पूर्ण हंगाम वाया जातो.कृषि विभागाने अनधिकृत बियाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे.
---------
अनाधिकृत बियाणे खरेदी करू नये.जर तालुक्यात संशयास्पद अनाधिकृत बियाणे साठवणूक व विक्री होत असेल तर याची माहिती द्यावी.शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्या कडूनच बियाणे, रासायनिक खते व किटकनाशक खरेदी करावे व खरेदी केल्याची पक्के बिल शेतकऱ्यांनी जपून ठेवावे.
-चंद्रकांत निमोड,तालुका कृषि अधिकारी पोंभूर्णा

Post a Comment

0 Comments