चंद्रपुरात अल्पवयीन मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार; वसतीगृह प्रमुखासह चार जण ताब्यात
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबता थांबेना, आश्रम शाळा, मूकबधिर विद्यालय व अन्य संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थिनी सुद्धा आज सुरक्षित नाहीत. सर्वात जास्त आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांवरच अत्याचार झाल्याचे उघडतीस येत आहे.
चंद्रपुरातील एका शाळेत संतापजनक प्रकार घडला. शाळेच्या वसतीगृहात एका मूकबधिर विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची समता जनक तितकीच खळबळजण घटना उघडतीस आली आहे. विद्यार्थिनी वस्तीगृहात एकांतात असल्याचं दिसताच वसतीगृह प्रमुखांनी जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केला, असा आरोप आहे. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न :
वसतीगृह प्रमुखानं लैंगिक अत्याचार केल्याचं पीडित विद्यार्थिनीनं शिक्षिकेला सांगितलं. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर येताच, शाळा प्रशासनानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. मात्र, पीडित विद्यार्थिनी आणि तिचे कुटुंबीय तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेत २५ एप्रिलला लेखी तक्रार दिली.
पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल :
पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन यांनी सदरील प्रकरणाची चौकशी केली. दरम्यान, आरोपींवर अट्रॉसिटी कायद्यातील कलम तीन, बालकांचं लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमचे कलम १७, कलम २१, कलम ९ (फ), कलम ८ व कलम ९ (क), कलम ३५४, कलम ३५४-ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाचा तपास सुरू :
अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर चंद्रपुरातील पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी कठोर शिक्षा व्हावी अशी पालकांनी मागणी केली आहे.
0 Comments