चामोर्शी: गडचिरोली जिल्ह्यात नव्यानेच सुरू असलेल्या सुरजागड प्रकल्पाच्या लोहखनिज वाहतुकीची नागरिकांना झळ बसत आहे. या वाहतुकी विरुद्ध अनेक संघटनांनी आवाज उठवला मात्र तो आवाज कुठेतरी दाबला गेला. आज दिनांक 14 मे 2023 रोजी चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहरात बारा वर्षीय मुलीला चिरडल्याची दुर्दैवी घटना तीन वाजता चे सुमारास घडली. सोनाक्षी मसराम वय बारा वर्षे असे या दुर्घटनेत मृत पावलेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. गावाचे नाव कळू शकले नाही. या घटनेमुळे काही काळ घटनास्थळावर तणाव पसरला होता.
आपल्या मामासोबत सोनाक्षी आष्टी वरून गुलबिपरीकडे जात होती दरम्या आष्टी येथील वनविभागाच्या नाक्यासमोर दुचाकी घसरली. आणि दोघेही खाली पडले. दरम्यान लोहखनिज घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली मुलगी आल्याने ति चीरडल्या गेली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर ट्रक चालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून प्रसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. घटनास्थळावर पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले आपल्या सहकानिशी दाखल झाले. पुढील कारवाई सुरू आहे.
0 Comments