Ticker

6/recent/ticker-posts

दुःखद घटना: डॉक्टर चंद्रकांत सरकार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन




चामोर्शी तालुका प्रतिनिधी
   डॉक्टर चंद्रकांत सरकार यांचा गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारात दरम्यान मृत्यू झाला.
      मूडचे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुका कन्हाळगाव येथील रहिवाशी असून ते आठ ते दहा वर्ष चंद्रपूर जिल्ह्यातील जुनगाव येथे वैद्यकीय व्यवसाय करीत होते. त्यानंतर त्यांनी स्वतःचे गाव कन्नड गाव येथे राहून आजूबाजूच्या खेड्यात वैद्यकीय सेवा देत होते.
    त्यांना स्वच्छ श्वास घेण्यात अडचण येत असल्यामुळे 17 मार्च 2023 रोजी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र आज त्यांचा उपचारादरम्यान दुपारी तीनच्या सुमारास मृत्यू झाला.
      त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, ज्योतिष आणि नितीश, एक मुलगी मोनिका, नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.
      त्यांचा मृतदेह गडचिरोली वरून त्यांचे राहते गाव कन्नड गाव येथे आणण्यात येत असून उद्या दिनांक 19 मार्च रोजी त्यांचे व अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments