पोंभुर्णा: तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी दत्तक गाव म्हणून घेतलेल्या जुनगावात विजेची समस्या नेहमीच उद्भवत असते. या बाबीकडे महावितरणने लक्ष केंद्रित करून ताबडतोब वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि आज सकाळपासून खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत सुरू करावा अशी मागणी जूनगावचे उपसरपंच तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष श्री राहुल भाऊ पाल यांनी केली आहे.
आज सकाळपासूनच अवकाळी पावसाने व विजेच्या कडकडाटाने परिसर दणाणून सोडला.याच दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला. तेव्हापासून अद्याप पावतो सुरळीत झालेला नाही. त्यामुळे अनेकांची विजेवर चालणारी कामे खोळंबली आहेत. नांदगाव, जूनगाव, देवाडा बुज. घोसरी इत्यादी गावचा वीजपुरवठा खंडित असल्यामुळे महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा तात्काळ सुरू करावा अशी मागणी केली आहे.
0 Comments