कान्होलीत आढळला हातपपाच्या पाण्यात नारू
दरारा 24 तास न्युज नेटवर्क
चामोर्शी: तालुक्यातील कान्होली गावातील अंगणवाडी केंद्राजवळ असलेल्या हातपंपाच्या पाण्यात महिला पाणी भरत असताना नारू आढळल्याने एकच खळबळ उडाली. येथील नागरिक सुरेश भाकरे यांनी त्या नारुला बाटलीत बंद करून माध्यम प्रतिनिधीला माहिती दिली. गावातील सार्वजनिक
पानवठ्याची निगा राखणे ही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने हातपंप व विहिरी यात ब्लिचिंग पावडर टाकून पाणी निर्जंतुकीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
0 Comments