Ticker

6/recent/ticker-posts

*विसापूर मध्ये श्री संताजी जगनाडे महाराज 399 वी जयंती महोत्सव* - तेली समाजाने हक्कासाठी सामूहिक लढा द्यावा

*विसापूर मध्ये श्री संताजी जगनाडे महाराज 399 वी जयंती महोत्सव*-


- तेली समाजाने हक्कासाठी सामूहिक लढा द्यावा-मान्यवरांचा सूर।

दरारा 24 तास न्युज, 
         बल्लारपूर: महाराष्ट्राचे थोर संत, तेली समाजाचे आराध्य दैवत श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा 399 वी जयंतीचा महोत्सव विसापूरमध्ये तेली समाज बांधवांच्या वतीने उत्साहाने साजरा करण्यात आला.
          कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम श्रीमती शकुंतला इटनकर व श्रीमती बहिणाबाई गिरडकर यांच्या हस्ते घटस्थापना करून ढोल पथक रॅली काढून गावातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन गुरुदास गिरडकर, प्रमुख पाहुणे शालिनी आंबटकर मॅडम प्रभारी प्राचार्य, राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर व अमृताताई बावनकुळे, शेवंताताई बावणे, मिताताई गिरडकर याच्या शुभहस्ते करून जगनाडे महाराज यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन करण्यात आले. 
          याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमात संतांचे योगदान विषयावर भाषण स्पर्धा, शिक्षणाचे महत्व विषयावर निबंध स्पर्धा व 5 ते 13 वर्ष वयोगटात नृत्य स्पर्धा घेण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमात पर्यवेक्षिका म्हणून पंचशीला पाटील मॅडम, प्रतिभा आवारी मॅडम, विभा वैरागडे मॅडम उपस्थित होते. तसेच जयंतीनिमित्त सामाजिक दायित्व जोपासून मातोश्री वृद्धाश्रम विसापूर येथे तेली समाज तर्फे फळ, बिस्कीट व नास्त्याचे वितरण करण्यात आले.
         श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती महोत्सवात अध्यक्षस्थानी नरेंद्र इटनकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून यश बांगडे सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ, नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारपूर, चंदाताई वैरागडे अध्यक्ष चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, आशिष देवतळे कार्याध्यक्ष प्रा.तैलिक महासभा चंद्रपूर तसेच प्रमुख अतिथी म्हणून दिनेश वरघणे सर मुख्याध्यापक जि.प.हायस्कूल विसापूर उपस्थित होते. 
          या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी समाजबांधवांना जगनाडे महाराज यांच्या जीवन कार्यावर भर देऊन समाजाला नवी ऊर्जा देण्याच्या दृष्टीने प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. समाजातील तरुणांनी संताजी जगनाडे महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील वाटचाल करावी असा संदेश अंगीकृत करण्याच्या संकल्प या जयंतीच्या महोत्सव प्रसंगी घेण्यात आला व समाजाला संघटित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन समाजाला सर्वांगीण विकासामध्ये पुढे नेण्याचे प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षिस वितरण करण्यात आले.
          याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य गजानन पाटणकर, ग्रा.पं.सदस्या सरोज केकती, माजी सरपंच बंडुजी गिरडकर, तेली समाज उपाध्यक्ष दिनकर गिरडकर, सचिव अक्षय देशमुख, कोषाध्यक्ष नंदकिशोर गिरडकर, सहसचिव संतोष वैरागडे, संचालक रामदास हरणे, विजय गिरडकर, शंकर गिरडकर, अरुण बावणे, अशोक गिरडकर, विलास गिरडकर, विनोद गिरडकर, गजानन बावनकुडे, प्रफुल पोहाणे, प्रितम पाटणकर, तेली समाज युवा कार्यक्रम नियोजन समिती सदस्य, तेली समाज युवती मंच व सर्व तेली समाजबांधव उपस्थित होते. 
           या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय देशमुख, संचालन श्रद्धा साखरकर व आभार विठ्ठल साखरकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments