Ticker

6/recent/ticker-posts

स्मशानभूमीवर ग्रामपंचायतीचेच अतिक्रमण! जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल


स्मशानभूमीवर ग्रामपंचायतीचेच अतिक्रमण! जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल

अजित गेडाम,( प्रतिनीधी-जुनगाव)

पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत चक फुटाणा येथे PGW क्रिडांगण तयार करण्यासाठी MRGS अंतर्गत 12,95,006. 78 निधी मंजुर करण्यात आला होता, परंतु ग्रामपंचायत चकफुटाणाचे सरपंच यांनी त्या जागेची चौकशी न करता स्मशानभूमीच्या राखीव जागेत काम करण्यात आले, असल्याचा आरोप अरविंद मानकर यांनी केला आहे.

स्मशानभुमी साठी राखीव अस‌लेल्या गाव नमुना सात नुसार भुमापन क्रमाक व उपविभाग ८६ नुसार सदर सर्वे मध्ये ०.८१ आर झुड्पी जंगल व मरगट स्मशानभुमी करीता राखून ठेवलेली आहे. या जागेची शहानिशा व चौकशी ग्रामपंचायत, तसेच पंचायत समिती ने केली नाही. आणि कामासाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला.

या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता अरविंद मानकर यांनी ग्रामपंचायत पंचायत समिती पोंभुर्णा, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर तसे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे अर्ज सादर करण्यात आला.परतू या प्रकरची कोणीही चौकशी केली नाही. तसेच कोणतीही कार्यवाही केली नाही तरी सादर प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात यावी व शासकीय मालमत्तेचा योग्य वापर करावा, तसेच अर्ज सादर प्रकरणाची चौकशी केली नाही आणि कोणतीच कार्यवाही केलेली नाही, तरी सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात यावी व शासकीय मालमत्तेचा योग्य वापर करावा तसेच पी जी डब्ल्यू क्रीडांगण तयार करण्यासाठी लागणारे, कागदपत्रे सुद्धा पूर्ण नाहीत. कारण, अर्जदाराने माहितीचा अधिकार ठाकून माहीती मागितली असता सदर माहीती अपुरी देन्यात आली, यावरून या झाल्याचा कामात गैरव्यवहार पूर्ण नसतान ना काम करणात आले तसेच काही रक्कम सुद्धा उचल केल्या गेली आहे.

अशा पद्धतीने शासकिय निधीचा गैरवापर होत असुन यामध्ये शासकिय कर्मचारी, सुद्धा गैरप्रकारात आहेत, या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषी असतील जे कुणी अशा शासकिय कर्मचारी सरपंच यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments