घनश्याम मुलचंदानी,विनोद अहिरकरांची रणनीती!
बैठकीला तीनशे पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती
चंद्रपूर: बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पळसगाव वांढरवाडी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीला पळसगाव, मानोरा, इटोली, कोठारी, आंमडी, कोर्टी मक्ता, गिलबिली, कळमगाव आदी गावातील जवळपास 300 हून जास्त कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर बैठकीचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम मूलचंदानी, ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर, गोविंदा उपरे यांनी केले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या व इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना या क्षेत्रातून प्रचंड मताधिक्याने मतदान करून विजय संपादन करून दिल्याबद्दल पळसगाव- कोठारी जिल्हा परिषद क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने काम करून पक्षाला विजय संपादन करून दिला त्याच पद्धतीने पुढील येणारी विधानसभा निवडणूक ही काँग्रेसचीच असेल या तयारीने कामाला लागावे असा निर्धार बैठकीत करण्यात आला. कार्यकर्त्यांनी जोशात या निर्धाराचे स्वागत करून येणारी विधानसभा ही आमचीच असेल असा आशावाद व्यक्त केला.
बैठकीला हर्ष वाघाडे, नितीन मामुलकर, सुरेश वाचाळे, बंडूभाऊ इटणकर, प्रमोद दीपक लोहे, नामदेव बावणे, श्री हिवरे, विनोद वाघमारे, राजेश हुमणे, बंडू वासाळे, वासुदेव येरगुडे, शेखर आलाम, देविदास नरेश बुरांडे, सुनील कोहळे, विलास गव्हारे, अरुण बुरांडे, दिलीप भोयर, अजय उपरे, घनश्याम बुरांडे, संघर्ष वैकुंठवार याशिवाय अनेक काँग्रेस कार्यकर्ते व मातब्बर कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.
0 Comments