संतोष सिंह रावत यांनी केले गावकऱ्यांना मार्गदर्शन
दरारा 24 तास
बल्लारपूर: काँग्रेस नेते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषभाऊ रावत यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात तालुक्यातील मानोरा, इटोली येथे बैठक घेण्यात आली.या बैठकीत युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन निलमवार , युवक काँग्रेसचे सुजित खोब्रागडे, गणेश निलमवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक घेऊन चर्चा करण्यात आली.
गावातील महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, काँग्रेसचे मुख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीत संतोष भाऊ रावत यांनाच विधानसभेची उमेदवारी मिळावी, आम्ही मोठ्या ताकतीने काम करू असा संकल्प केला.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (पवार गट)जिल्हा उपाध्यक्ष भास्कर कावळे, दत्तात्रय घीवे, रमेशजी जम्पलवार तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, गुरुदेवजी बुरांडे, विलास गवारे तालुका सचिव काँग्रेस, सुनील कोहरे ग्रा.पं.सदस्य मानोरा , विकास पिपरे, ऋषी पिपरे ग्रामपंचायत सदस्य, अजय बुरांडे, तथा इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments