Ticker

6/recent/ticker-posts

पोंभूर्णा तालूका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पी.एच.गोरंतवार तर सचिवपदी कावटवार यांची बिनविरोध निवड -उपाध्यक्ष जिवनदास गेडाम, कोषाध्यक्ष दिलीप मॅकलवार

पोंभूर्णा तालूका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पी.एच.गोरंतवार तर सचिवपदी कावटवार यांची बिनविरोध निवड


-उपाध्यक्ष जिवनदास गेडाम, कोषाध्यक्ष दिलीप मॅकलवार 

आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी

दरारा 24 तास

पोंभूर्णा :- तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली.या निमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून दि.६ जानेवारीला पोंभूर्णा तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित करण्यात आली.यात पोंभूर्णा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी पी.एच.गोरंतवार यांची तर सचिवपदी दैनिक सकाळचे आशिष कावटवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी पोंभूर्णा तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित करण्याच्या उद्देशाने सभेचे आयोजन करण्यात आले होते.सदर सभेत दोन वर्षाकरिता नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवडण्यात आली.पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे पी.एच.गोरंतवार यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.तर संघाच्या सचिवपदी दैनिक सकाळचे आशिष कावटवार,उपाध्यक्ष जिवनदास गेडाम, सहसचिव पंकज वडेट्टीवार,कोषाध्यक्ष दिलीप मॅकलवार यांची निवड करण्यात आली.तर कार्यकारिणी सदस्य म्हणून निलकंठ ठाकरे,सुरेश कोम्मावार, बबनराव गोरंतवार,विजय वासेकर,विकास शेडमाके,भुजंग ढोले,इक्बाल कुरेशी तर संपर्क प्रमुख म्हणून रुपेश निमसरकार यांची निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments