Ticker

6/recent/ticker-posts

पोंभुर्णा तहसील कार्यालय वाऱ्यावर! अधिकारी कर्मचारी धुर्‍यावर

पोंभुर्णा तहसील कार्यालय वाऱ्यावर! अधिकारी कर्मचारी धुर्‍यावर


जिवनदास गेडाम, (विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर: गतिमान प्रशासनाचा दावा करणारा महसूल विभाग जनतेची विहित वेळेत कामे करण्यास समर्थ ठरत आहे.


पोंभुर्णा तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार नियुक्त असल्यामुळे वेळ देऊ शकत नाही. तहसीलदारच तहसील कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांच्या हाताखालच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अधिकच फावत चालले आहे. जनतेची कामे वेळेत करीत नाहीत, कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. कार्यालयीन वेळेत अनेक कर्मचारी, अधिकारी "बाजार" करीत दिसतात. 


या तालुक्याचे व क्षेत्राचे नेतृत्व करणारे राज्याचे वजनदार मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार हे सातव्यांदा विधानसभेत निवडून गेले. मात्र जनतेच्या समस्यांना त्यांनी कधीच गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप होत आहे. चार डिसेंबर रोजी तालुक्यातील समस्यांचा पाढा वाचत प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. तालुक्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर आमदारांचा कसल्याही प्रकारे वचक नसल्यामुळे नागरिकांची कामे अधिकारी करीत नसल्याचा आरोपही नागरिकांमधून केल्या जात आहे. 


तालुक्याला नियमित तहसीलदार नाही, शासकीय विभागात कर्मचारी नाही, शाळांना शिक्षक नाही, दवाखाना आहे परंतु डॉक्टर नाही, डॉक्टर असेल तिथे औषध नाही, योजना अनेक अंमलात आणतात परंतु अंमलबजावणी नाही. एकंदरीत तालुक्यात अनेक समस्या उग्ररूप धारण करीत आहेत.

तालुक्याला नियमित व स्थायी तहसीलदार देऊन नागरिकांची कामे सुरळीत करावीत या मागणीचे निवेदन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर वैभव पिंपळशेंडे यांच्या नेतृत्वात नागरिक देणार असल्याचे कळविले आहे. आमदार महोदयांनी या बाबीची गंभीर दखल दखल घेतल्यास नवल वाटू नये!

Post a Comment

0 Comments