Ticker

6/recent/ticker-posts

आता वनमंत्रांनीच वाघाचा बंदोबस्त करावा-इंजी. वैभव पिंपळशेंडे

आता वनमंत्रांनीच वाघाचा बंदोबस्त करावा-इंजी. वैभव पिंपळशेंडे


पोंभुर्णा: वन विभागाचे अधिकारी कर्मचारी वाघाचा बंदोबस्त करण्यास अपयशी ठरले असल्यामुळे आता नरभक्षी वाघाचा बंदोबस्त खुद्द वनमंत्र्यांनीच करावा अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते इंजिनीयर वैभव पिंपळशेंडे यांनी केली आहे.

तालुक्यातील पिपरी देशपांडे, चेक ठाणा, गोवर्धन,नांदगाव परिसरातील शेत शिवारात अनेक महिन्यापासून वाघांचा वावर आहे. नुसता वावरच नसून हा नरभक्षी वाघ अनेक जनावरांचे बळी घेतलेले आहे. मानव प्राण्यावर सुद्धा हल्ले होत आहेत. वनविभाग मोठ्या प्राणहानीची वाट बघत आहे की काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

दररोज वाघाच्या दर्शनामुळे शेतकरी भाई भीत झाले असून शेतात काम करणे थांबविले आहे. शेतमजूर शेतात काम करण्यास तयार नसल्याने त्यांचेवरही उपासमारीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची खरोखर काळजी असेल तर शासनाने तात्काळ वाघाला जर बंद करून शेतकऱ्यांना, शेतमजुरांना न्याय द्यावा अशी मागणी वैभव पिंपळशेंडे यांनी केली आहे. वाघाच्या भीतीमुळे अनेक कामे पडली आहेत.

Post a Comment

0 Comments