शिवसेनेचे महेश श्रीगिरीवार यांच्या मागणीला यश
@ सार्वजनिक बांधकाम विभागाला युवासेनेचे महेश श्रीगिरीवार यांनी निवेदनातून केली होती मागणी, मागणीची दखल....
दरारा 24 तास न्युज नेटवर्क
पोंभुर्णा: शहरतातील मुख्य रस्त्यावरिल देशी दारू दुकानाजवळ शहरात जाणारा व स्वामी विवेकानंद स्कुलला लागून तीन मार्ग आहेत. येथे स्पीड ब्रेकर नसल्याने वाहन चालक भरधाव गाडी पळवत आहेत. याच रस्त्यालगत शालेय विद्यार्थ्यांची व कॉन्वेंटच्या लहान मुलांची रेलचेल असते.या मुख्य रस्त्यावर लहान मुले,वृद्ध, पायी जाणारे नागरिकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे युवासेनेचे शहर प्रमुख महेश श्रीगीरीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला मागणीचे निवेदन देण्यात आले होते.मागणीच्या निवेदनाची दखल घेत अखेर मुख्य रस्त्यावरिल त्या चौकात स्पीड ब्रेकर लावण्यात आले. परिसरातील नागरिक व शाळकरी विद्यार्थी या मागणीचे स्वागत करीत आहेत.
0 टिप्पण्या
Thanks for reading