फुटाणा मोकासा येथील घटना ...
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : विधवा महिलेला योजनांचा फायदा मिळवून देतो अशी बतावणी करत फुटाणा ग्रामपंचायतीत आपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या खुशाल पाल याने विधवा महिलेच्या घरात शिरून तिचा विनयभंग केल्याची घटना 22 जानेवारी 2025 रोजी घडली.दरम्यान महिलेच्या तक्रारीवरून मूल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
सविस्तर वृत्त असे की,चार महिन्यापूर्वी तक्रारदार पीडित महिलेच्या पतीचे निधन झाल्याने दोन मुलींसह घरात राहत असलेल्या विधवा महिलेचा खुशाल पाल (३१) याने घरात घुसून विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. २२) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी फरार आहे.
मूल पोलिस ठाणे अंतर्गत बेंबाळ दूरक्षेत्राच्या हद्दीतील फुटाणा येथील महिलेच्या पतीचे सप्टेंबर-२०२४ रोजी निधन झाले. त्यामुळे आपल्या मुलींसह मिळेल ती मजुरी करून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. पतीच्या मृत्यूनंतर मृत्यू दाखला व शासकीय योजनेच्या लाभासाठी कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी ग्रामपंचायतचा संगणक परिचालक असलेला आरोपी खुशाल पाल याच्याकडे गेली. तेव्हा आरोपींनी महिलेचा मोबाइल नंबर घेऊन दाखले घरपोच पाठवून देतो असे सांगितले.
दरम्यान बुधवारी रात्री महिला आपल्या घरी असताना आरोपी घरात घुसला. तिने आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने पळ काढला. या घटनेनंतर तिने पोलिसात तक्रार दिली.
आरोपीचा शोध सुरू
घटनेची तक्रार मूल पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी कलम ७४, ७५(२), ३३२ (क), ३५४ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केलाय. पोलीस विभागाने आरोपीचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम करीत आहेत.
0 टिप्पण्या
Thanks for reading