उद्या जूनगाव येथे सांस्कृतिक महोत्सव। मान्यवरांची राहणार उपस्थिती अलकाताई आत्राम कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ।

उद्या जूनगाव येथे सांस्कृतिक महोत्सव। मान्यवरांची राहणार उपस्थिती


अलकाताई आत्राम कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ।

पोंभुर्णा: प्रतिनिधी ।

गणराज्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनगाव येथे दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी रात्री आठ वाजता सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर दिवसभर विविध स्पर्धा आयोजित केले आहेत.व रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश अध्यक्ष अलकाताई आत्राम राहणार असून अध्यक्षस्थानी भाजपचे आष्टा ग्रामपंचायतीचे सरपंच हरीश हे राहणार आहेत. तर दीपप्रज्वलन माजी उपसभापती विनोद भाऊ देशमुख, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अजय भाऊ मस्के, फुटाणा ग्रामपंचायतचे उपसरपंच नैलेश भाऊ चिंचोलकर, भोसरीचे उपसरपंच जितू भाऊ चुधरी, जूनगावचे प्रभारी सरपंच राहुल भाऊ पाल, यांच्या हस्ते होणार आहे. 

माननीय कान्हुजी पाटील भाकरे पोलीस पाटील जुनगाव, तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल दसुरजी चुधरी, गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे सर, केंद्रप्रमुख अरविंद तामगाडगे सर, ग्रामपंचायत सदस्य तेजपाल रंगारी, ग्रामपंचायत सदस्य विश्वेश्वर जी भाकरे, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पूनम ताई चुधरी, ग्रामपंचायत सदस्या पल्लवी ताई देशमुख, ग्रामपंचायत सदस्या माधुरीताई झबाडे, माजी सरपंच व पत्रकार जीवनदास गेडाम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र मुरलीधर पाल, उपाध्यक्ष यास्मिता चौधरी, चंद्रकलापोरटे, रीना माहोरकर, अश्विनी आऊतकर, माधुरी घोगरे, सहाय्यक शिक्षक निलेश ठाकरे, सहाय्यक शिक्षक तेजराम एल लंजे, निंबाजी ठाकूर, देवरावजी घोटेकर, जीवनजी मेश्राम, शालिकजी चुधरी, सोनी ताई चुधरी, वंदनाताई मेश्राम, विद्यार्थी प्रतिनिधी समीर गोहने, विद्यार्थिनी प्रतिनिधी राधिका देशमुख यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू