राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पोंभुर्णा काँग्रेस कमेटीच्या वतीने तहसीलदारला निवेदन

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पोंभुर्णा काँग्रेस कमेटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन


दरारा 24 तास
  पोंभुर्णा:  निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असून भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूका घेण्यासाठी या संस्थेची स्थापन केली आहे. राज्यघटनेने निवडणूक आयोगाला देशातील संपूर्ण निवडणुकांचे निर्देश आणि नियंत्रण करण्याचे अधिकार दिले आहेत. लोकशाही शासन व्यवस्थेत निवडणूक आयोगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. देशातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे आणि निवडणुकीत मतदार हा राजा असतो परंतु मागील काही वर्षातील निवडणूक आयोगाची भूमिका पाहता ती पक्षपाती दिसत आहे.


         महाराष्ट्रात नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक, अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसले. राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजपा युतीच्या विरोधात होती. सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते, अवघ्या सहा महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. मतदारयाद्यांमध्ये घोटाळा करण्यात आला, याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करुनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्याच्या अंतरात तब्बल ५० लाख मतांची वाढ कशी झाली ? मतदानादिवशी संध्याकाळी ५ वाजता जाहिर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यातमध्ये मोठी तफावत आहे. यातही ७६ लाख मतदान वाढलेले दाखवले आहे. सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था होती. त्यामुळे मतदारयाद्यातील घोळ, रात्रीच्या अंधारात वाढलेले ७६ लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत अशी .मागणी काँग्रेस पक्षाने केली असता आजपर्यंत हि माहिती देण्यात आली नाही.
     भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाकडून भयमुक्त,पारदर्शक निःपक्षपाती वातावरणात सर्व निवडणूका पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही ज्या पद्धतीने सध्या निवडणुका घेत आहे, त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
        दिनांक २५ जानेवारी ( राष्ट्रीय मतदार दिनी) लोकशाहीच्या रक्षणासाठी तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने पोंभुर्णा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष श्री. वासुदेव पाल यांच्या नेतृत्वात तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.
      यावेळी  ओमेश्वर पद्मगिरीवार जिल्हा महासचिव, शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अशोक गेडाम, किसानसेलचे अध्यक्ष विनायक बुरांडे, अशोक सखलवार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा, अमरसिंग बघेल, जयपाल गेडाम, धमाभाऊ नीमगडे,पराग मुलकलवार,सुनील कुंदोजवार ,मारोती वसेकर, एकनाथ रमगिरकर,रुपेश पुडके, विष्णू व्याहाडकर,प्रकाश पुडके तुकाराम, टेकाम इ.उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू