जिकडे तिकडे रेतीची वारे माप चोरी? महसूल प्रशासन निद्रिस्त!
चेक निखितवाडा रेती घाटातील रेती वाहतूक भिमणी नदीपात्रातून?
अंधारी नदिच्या नैसर्गिक धारेला अडवून बिगडवला जात आहे पर्यावरणाचा समतोल
जिवनदास गेडाम (वि.प्र.)
चंद्रपूर:गोंडपिपरी तालुक्यातील रेती घाटाची रेती अंबरनाथ तालुक्यातून धुमधडाक्यात सुरू असल्यामुळे रस्त्यांची चाळण होत आहे. तसेच अनेक गावातून ही वाहतूक होत असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. धूळ व ध्वनी प्रदूषणाने नागरिकांचे बेहाल होत असताना व करोडोचा महसूल बुडवला जात असताना महसूल विभाग कारवाई का करत नाही हा एक प्रश्नच निर्माण झाला आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील चेक लिखितवाडा रेतीघाट शासकीय बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ ला मंजूर करण्यात आला आहे. या रेतीची उचल व वाहतूक करण्याची जबाबदारी हैद्राबाद येथील एका बांधकाम कंपनीला देण्यात आली. मात्र सदर रेतीघाटात शासकीय नियम धाब्यावर बसवून अवैध रेती उपसा व वाहतूक करण्यात येत आहे.
रेती वाहतूक करणारे एवढ्यावरच न थांबता नदीतून मुरूम टाकून चेक लिखितवाडा ते भिमणी घाट असा चोर रस्ता तयार करून रेती तस्करी करण्याचा प्रकार नदीतून केल्या जात आहे. शासकीय यंत्रणा मात्र अश्या अवैध प्रकाराला आळा न घालता मुग गिळून गप्प बसले असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
चेक लिखितवाडा घाट शासकीय रेती बांधकामासाठी राखीव ठेवण्यात आला.चेक लिखितवाडा येथील ४.९० हेक्टर आर. जागा सर्व्हे नंबर १७८,१७९,१८० राखीव ठेवण्यात आले. ७०० मिटर लांब ७० मिटर रूंद व १ मिटर खोल असा मापदंड वापरून १७३१४ ब्रास रेती उत्खनन करायचे होते. ज्या कंपनीला याचे कंत्राट मिळाले ती कंपनी आधी नियमानुसार कामाला लागली होती. मात्र अवघ्या महिन्याभरातच शासकीय नियमाला तिलांजली देत अवैध उत्खननाचा नवा फॉर्म्युला तयार केला आहे.
अवैध रेती वाहतूक राजरोसपणे करता यावी यासाठी संबंधीत बांधकाम कंपनीने तर चक्क नदीतून मुरूम टाकून व अंधारी नदिच्या नैसर्गिक पाणी प्रवाहाला (धारेला)अडवून पर्यावरणाचा समतोल बिगडवत, रस्ता तयार करून रेती भरलेले हायवा ट्रक भिमणी घाटाकडे काढण्यात येत आहे. निर्धारीत केलेल्या नदीपात्रा ऐवजी दुसराच नदीपात्र पोखरून टाकण्यात आलेला आहे. असा प्रकार होत असताना प्रशासनाकडून होत असलेली मौनधारणा अनेक प्रश्नांना उजागर करणारी आहे. एवढ्या मोठ्या धाडसामागे प्रशासनासमोर नेमके कोणते वजन वापरण्यात येत आहे. असा प्रश्न निर्माण होत आहे.
गोंडपिपरी व पोंभूर्णा या दोन्ही तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांना चकमा देणाऱ्या रेती कंत्राटदारावर, कंपनीवर रेतीचे अवैध उत्खनन व ओव्हरलोड वाहतूक व नदिच्या नैसगिक मार्गाला अडवून रस्ता बनवून पर्यावरणाचा समतोल बिगडवणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी पर्यावरणवाद्यांनी केली आहे.
रेती स्टॉकचा सुचक फलक लावण्यात आले नाही.
सबंधित विभागाने जमीन किती खोल खोदायची हा मापदंड ठरवून दिलेला असतो. परंतु या ठिकाणी एक मिटरपेक्षा अधिक खोल रेतीचे उत्खनन केले जात आहे. अंधारी नदीच्या नैसर्गिक पाण्याची दिशा वळवत नदीतूनच रोड तयार करून शार्ट कट घेत भिमणी नदीपात्रातून रेती वाहतूक करण्यात येत आहे.
नदीतून रस्ता बनवून व नदीचा प्रवाह थांबवून पर्यावरणाचा समतोल बिगडवत चेक लिखितवाडा रेती घाटातील रेती वाहतूक भिमणी नदीपात्रातून केल्या जात आहे. रॉयल्टी मारताना बैठे पथक रात्रभर ठेवल्यास विना रॉयल्टी चोरटी व ओव्हरलोड वाहतूक होणार नाही. वाहतूक करणाऱ्या कंपनीकडून अटी व शर्थीचे भंग करून अवैध रेतीची तस्करी केली जात. मजुरांच्या दृष्टीने उन्हापासून वाचण्यासाठी ग्रिनमेट वापरण्यात आलेले नाही. चेक लिखितवाडा येथील रेती घाटात होत असलेल्या अवैध प्रकाराकडे खनिकर्म व बांधकाम अधिकाऱ्यांची मुकसंमती आहे. रेतीचा उपसा नदीपात्रातून १ मीटर पेक्षा अधिक होत असून. सदर घाट बंद करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरज माडुरवार यांनी केली आहे.
=======================
गोंडपिपरी तालुक्यातील रेती वाहतूक पोंभुर्णा तालुक्यातील अनेक गावांतून रात्री बे रात्री वाहतूक सुरू असल्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. वायु व ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून नागरिकांचे आरोग्यह धोक्यात येण्याची शक्यता आहे. पर्यावरणाबरोबरच नागरिकांचे आरोग्य जपण्याचे कार्य महसूल विभागाने करावे आणि तालुकतून होणारी ही वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी पोंभुर्णा तालुका शिवसेना उपप्रमुख जीवनदास गेडाम यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading