नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा-सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र बोधलकर यांची मागणी
पोंभुर्णा: (प्रतिनिधी) तालुक्यातील , अनेक गावात व तहसील मंडळात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करून प्रस्ताव तात्काळ शासन स्तरावर पाठवा असे अशी मागणी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष व माजी सरपंच जामतुकुम यांनी केली आहे.
तालुक्यातील सर्व तहसील मंडळातील शेतकऱ्यांचे धान (भातपीक)कापूस, मका, सोयाबीन, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यास्तव तहसील मंडळात अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश करावे व अतिवृष्टी नुकसान भरपाईचा अहवाल शासन स्तरावर पाठविण्यात यावा अशी मागणी बोधलकर यांनी केली आहे.
0 Comments