daraara 24 Taas "news website"Hindi Marathi news "darara 24tas"darara 24 Taas "political"gavakadchya batmya "

२७.६.२३

बँक ऑफ इंडिया चा भोंगळ कारभार, 15 दिवसांपासून लिंक नसल्याचा ग्राहकांना फटका- शिवसेनेने केला बँक व्यवस्थापकाचा घेराव, लवकरच सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन

बँक ऑफ इंडिया चा भोंगळ कारभार, 15 दिवसांपासून लिंक नसल्याचा ग्राहकांना फटका-


शिवसेनेने केला बँक व्यवस्थापकाचा घेराव, लवकरच सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन

मुल: तालुक्यातील बेंबाळ येथे असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखेत अनेक दिवसांपासून अनेक समस्या उद्भवत आहेत. त्याचा फाटका सर्व ग्राहकांना बसत आहे. वारंवार बँकेत जाऊनही काम होत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते मधुकर झुंगाजी पवार व पोंभुर्णा तालुका शिवसेना उपप्रमुख जीवनदास गेडाम यांच्या नेतृत्वात शाखाधिकार्‍यांना घेराव घेराव घालून जाब विचारण्यात आला.

https://youtu.be/Kz9wPbkbHXY

मागील 15 दिवसापासून बँकेत लिंक नसल्याचे सांगण्यात येत असून ग्राहकांना याचा मनस्ताप सहन करून आर्थिक देवाणघेवाण होत नसल्यामुळे शेतकरी वर्ग तथा महिला बचत गट चा महिला अडचणीत आल्या आहेत.

सरकार महिला सक्षमीकरणाच्या हेतूने अनेक योजना राबवत असून महिलांना स्वयंरोजगारासाठी विविध योजना आखत आहे. उमेद च्या माध्यमातून अनेक महिला बचत गट कार्यरत असून या महिलांना वेळोवेळी बँकेत येऊन काम न करताच परत जावे लागत आहे.

शेतीचे हंगाम सुरू झाले असून शेतकरी वर्ग बी बियाणे खत व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी आपल्याच पैशाला बँकेत अनेकदा जाऊन पैसे मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

लवकरात लवकर अडीअडचणी दूर करून प्रकरणे निकाली काढावीत अन्यथा शिवसेना स्टाईलने दणका देण्यात येईल असा इशाराच यावेळी देण्यात आला.

शाखा व्यवस्थापक श्री लांजेवार यांनी लवकर सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे.


यावेळी मधुकर पवार, जीवनदास गेडाम, योगराज आंबटकर, प्रणय सागर देऊरकर, धनंजय घोगरे,कुणाल नितीन लोणारे, आर्यन सुधीर हुड,विशाल नरसपुरे, आणि ग्राहक वर्ग, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ