पोस्ट्स

मुल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मुल तालुक्यातील फिस्कुटी येथे आज पाणलोट प्रवास कार्यक्रमाचे आयोजन ⭐आमदार सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी विनय गौडा राहणार उपस्थित

इमेज
मुल तालुक्यातील फिस्कुटी येथे आज पाणलोट प्रवास कार्यक्रमाचे आयोजन ⭐ आमदार सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी विनय गौडा राहणार उपस्थित  🌍दरारा 24 तास न्यूज नेटवर्क🌍  ✍️संतोष गोंगले, तालुका प्रतिनिधी मुल  ⭐मुल: कृषी विभाग व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत 'वॉटरशेड यात्रा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कृपया या कार्यक्रमात उपस्थित राहुन आमचा आनंद व्दिगुणीत करावा, हि विनंती. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. ना. अशोकराव उईके साहेब पालकमंत्री, चंद्रपूर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्रीमती प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर सदस्य, लोकसभा चंद्रपूर - आर्णी लोकसभा क्षेत्र प्रमुख पाहुणे मा. श्री सुधिरभाऊ मुनगंटीवार आमदार, बल्लारपूर विधानसभा क्षेत्र श्री. विनयजी गौडा जिल्हाधिकारी, चंद्रपूर, मिस्टर. राकेश गिरडकर उपसरपंच ग्रा. फिस्कुटी,मा. श्री अजय चरडे उपविभागीय अधिकारी मुल, विवेक जॉन्सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर,मा. श्रीमती निलीमा मंडपे जिल्हा जलसंधारण अधिकारी चंद्रपूर,मा. श्री ग...

नांदगाव सह आठ गावातील पाणी प्रश्न पेटला ? 🌑सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भाऊ भोगावार यांच्या नेतृत्वात सीईओ यांना निवेदन 🌍आमदार सुधीर मुनगंटीवार यांनाही साकडे

इमेज
नांदगाव सह आठ गावातील पाणी प्रश्न पेटला ? 🌑 सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भाऊ भोगावार यांच्या नेतृत्वात सीईओ यांना निवेदन 🌍 आमदार सुधीर मुनगंटीवार यांनाही साकडे  ✍️मुल: तालुका प्रतिनिधी ...  =================== जाहीरात माननीय राकेश भाऊ बेलसरे शिवसेना जिल्हाप्रमुख गडचिरोली  =================== उन्हाळ्याची चाहूल लागली की जिकडे तिकडे पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू होते. आणि का होऊ नये? पाणी हे जीवन आहे, जीवन आहे तरच मानव आहे, हे ब्रीदवाक्य घेऊन सरकारही प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांच्या सुख सुविधांकडे लक्ष देत असते. म्हणूनच की काय! सरकारला "सरकार मायबाप" असे संबोधल्या जाते. आणि माय बापानेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्याची जबाबदारी असते. अर्थात जनता ही सरकारवर अवलंबून असते. अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची असते. त्या गरजा पूर्ण करता आल्या नाही तर त्या कुटुंबाप्रमुखाकडे कुटुंबातील लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच बनतो. तशीच काहीशी परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्यात अनेक तालुक्यात बघावयास मिळत आहे.  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. अन...

अवैध रेती साठ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

इमेज
अवैध रेती साठ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ✍️संतोष गोंगले,तालुका प्रतिनिधी .✍️दरारा 24 तास न्यूज नेटवर्क... मूल: प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून रेती तस्करांनी तालुक्यात अनेक ठिकाणी रेतीचा साठा करुन ठेवला आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचान्यांना रेती साठ्याबदल माहिती असताना कारवाई न करता याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. तालुक्यातील जानाळा प्रादेशिक वनविभागाच्या कक्ष क्रमांक ७१५ मध्ये बंधारा बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने आवश्यकतेपेक्षा अधिक २५ ते ३० ब्रास अवैधरित्या रेतीचा साठा करून ठेवला आहे. यात मोठ्या प्रमाणात अर्थकारण झाल्याने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कारवाई करण्याऐवजी बध्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. प्रादेशिक वनविभागाच्या कक्ष क्रमांक ७१५ ला लागून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बफरझोन क्षेत्र आहे. यामुळे येथे वन्यप्राण्यांचा वावर असल्याने मानव-वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांना जंगलात जाण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. परंतु, संबंधित कंत्राटदाराने मात्र वन्यप्राण्यांच्या जिवाशी खेळून रात्रीच्या सुमारास जवळपास २५ ते ३० ब्रास अ...

नांदगाव सह आठ गावांचा पाणीपुरवठा दोन महिन्यापासून बंद! सरपंच व ग्रामपंचायत कमिटी निष्क्रिय असल्याचा माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांचा आरोप

इमेज
नांदगाव सह आठ गावांचा पाणीपुरवठा दोन महिन्यापासून बंद!  सरपंच व ग्रामपंचायत कमिटी निष्क्रिय असल्याचा माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांचा आरोप ✍️ दरारा 24 तास न्यूज नेटवर्क... चंद्रपूर : बेंबाळ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे शुद्ध पाणी आठ गावांतील जनतेला वरदान ठरले होते. परंतु निष्क्रिय ग्रामपंचायतींनी वीज देयके थकविल्याने दोन महिन्यांपासून योजनेचा वीज पुरवठा महावितरणाने खंडित केला आहे. परिणामी नागरिकांना गावातील विहीर-बोअरवेलच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. नांदगाव हे गाव या योजनेतील मोठे गाव आहे. या गावात राजकीय पुढारी वास्तव्याने असतात. मात्र या गावच्या समस्यांकडे पुढार्‍यांचे दुर्लक्ष झाले की काय? असा प्रश्न उपस्थित होणे सहाजिकच आहे. नांदगाव ग्रामपंचायतीचे वसुली अभियान थकबाकी जमा झाली असताना सुद्धा विजेचे बिल का भरल्या जात नाही असा प्रश्न माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांनी केला आहे. येथील ग्रामपंचायत नागरिकांना सुख सोयी, सुविधा देण्यात असमर्थ ठरली आहे. येथील सरपंच निष्क्रिय असल्याचा आरोप माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांनी केला आहे. बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अनेक महिन्य...

सिंधलताई राठोड आदिवासी आश्रम शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न: प्राचार्य संतोष बक्षी यांनी केले ध्वजारोहण

इमेज
सिंधलताई राठोड आदिवासी आश्रम शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न: प्राचार्य संतोष बक्षी यांनी केले ध्वजारोहण विजय जाधव, नांदगाव प्रतिनिधी भारतीय गणराज्य दिनाचा कार्यक्रम व ध्वजारोहण नांदगाव येथील सिंदलताई राठोड आश्रम शाळेच्या भव्य आवारात पार पडला. या प्रसंगी प्राचार्य संतोष बक्षी यांनी ध्वजारोहण करून मानवंदना दिली. याप्रसंगी पालक गावातील नागरिक उपस्थित होते.

ट्रकच्या धडकेत नांदगाव (मुल) येथील शेतकऱ्याचा बैल जखमी.. केवळ 4000 देऊन शेतकऱ्यांची केली थट्टा

इमेज
ट्रकच्या धडकेत नांदगाव (मुल) येथील शेतकऱ्याचा बैल जखमी.. केवळ 4000 देऊन शेतकऱ्यांची केली थट्टा काय आहे प्रकरण जाणून घेण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.. चला तर जाणून घेऊया बातमीची रूपरेषा... संतोष गोंगले, (तालुका प्रतिनिधी) मुल: गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पामुळे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील अनेकांना आपले जीवन गमवावे लागले आहे. सुरजागड लोह प्रकल्पातून अवजड ट्रक भरधाव वेगाने धावत असल्याने पर्यायी रस्ता तयार करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी अनेकदा केली. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. अहेरी-अल्लापल्ली येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून पर्यायी रस्त्यासाठी आंदोलन केले होते. तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे अपघाताची शृंखला वाढतच जात आहे.गोंडपिपरी ते खेडी या महामार्गावरून ही वाहतूक सुरू झाली असल्याने या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावर सुद्धा या ट्रकांच्या अपघातात काही जणांचे जीव गेले काही दिवसापूर्वीच चांदापूर क्रॉसिंग वर एका परिचारिकेला या वाहनांनी चिरडले होते.य...

रीतीकच्या हत्येमुळे मूल शहरात तणाव; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, अरोपीला अटक

इमेज
रीतीकच्या हत्येमुळे मूल शहरात तणाव; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, अरोपीला अटक मूल तहसील कार्यालयासमोर रितिक शेंडे (२८) या युवकाची शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास तीन ते चार युवकांनी हत्या केली. दरारा 24 तास न्युज नेटवर्क चंद्रपूर आरोपींनी चाकूने वार करून रितिकला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत असलेल्या रितिकला येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ आगडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी रितिकला मृत घोषित केले.  विशेष म्हणजे शहरात तीन महिन्यातील ही दुसरी हत्येची घटना आहे. चंद्रपूर : मूल तहसील कार्यालयासमोर रितिक शेंडे (२८) या युवकाची शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास तीन ते चार युवकांनी हत्या केली. शहरात तीन महिन्यातील ही दुसरी हत्येची घटना आहे. शुक्रवारी रात्री मूल पोलीस ठाण्यात नागरिकांनी एकत्र येत आरोपींच्या अटकेची मागणी लावून धरली. शनिवारी शवविच्छेदनानंतर संतप्त नागरिकांनी मूल तहसील आणि पंचायत समितीजवळील घटनास्थळी मृतदेह ठेवून चक्काजाम आंदोलन केले. यामुळे चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील वाहतूक खोळंबली. दरम्यान, शहरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी आरोपी रा...

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू

इमेज
नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू नांदगाव: विजय जाधव  मुल: नांदगाव कडून गोंडपिपरीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचा गोवर्धन स्मशानभूमी वळणावर अपघात झाल्याने या अपघातात फोन लाईनचे काम करणारे सुपरवायझर सागर मिश्रा वय 25 रा.नागपूर यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली.घटनेची माहिती बेंबाळ पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील कारवाई प्रशांत गायकवाड मेजर व त्यांचे सहकारी करत आहेत.

घरकुल लाभार्थ्यांच्या निवड यादीत फेरबदल:ग्रामसेवक निलंबित : विभागीय चौकशी करण्याची उपसरपंच सागर देऊरक यांची मागणी

इमेज
घरकुल लाभार्थ्यांच्या निवड यादीत फेरबदल:ग्रामसेवक निलंबित : विभागीय चौकशी करण्याची उपसरपंच सागर देऊरक यांची मागणी दरारा 24 तास न्युज नेटवर्क  मूल: पंचायत समिती, मूलअंतर्गत ग्रामपंचायत, नांदगाव येथे कार्यरत असताना ग्रामसेवक शैलेश सहारे यांनी घरकुल लाभार्थी निवड यादी तयार करताना अनियमितता करून कर्तव्यात कसूर केल्याचे चौकशी अहवालावरून दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४चे ६ नुसार शिस्तभंगविषयक कार्यवाहीस पात्र ठरल्याने जिल्हा परिषद, चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी ग्रामसेवक शैलेश रामचंद्र सहारे यांना सेवेतून निलंबित केले आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायत, नांदगाव येथे कार्यरत असताना घरकुलासाठी गरजू लाभार्थीना डावलून ग्रामसेवक शैलेश रामचंद्र सहारे यांनी यादीत हेराफेरी करून गरजू लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. ही बाब ग्रामपंचायतीचे उपसरपंच सागर देऊरक व इतर सदस्यांना माहीत होताच त्यांनी गटविकास अधिकारी मूल व मुख्य कार्यपालन अधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली.  यासंदर्भात...

गोवर्धन येथे अवैध दारू विक्रीला उधाण! अवैध दारू विक्री बंद करण्याची गावकऱ्यांची मागणी🙏 ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील असक्षम असल्याचा आरोप

इमेज
गोवर्धन येथे अवैध दारू विक्रीला उधाण! अवैध दारू विक्री बंद करण्याची गावकऱ्यांची मागणी 🙏 ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील असक्षम असल्याचा आरोप  चंद्रपूर: मुल तालुक्यातील बेंबाळ पोलीस चौकीच्या हद्दीतील गोवर्धन येथे अवैध दारू विक्री सुरू असल्याने या अवैध दारू विक्रीमुळे गावातील संसार उध्वस्त होत आहेत. भावी पिढीवर याचा गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने गोवर्धन येथील अवैध दारू विक्रीवर आळा बसवून उचित कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.  मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व बेंबाळ पोलीस दुरक्षेत्राच्या अंतर्गत गोवर्धन येथे अनेक वर्षापासून अवैध दारूचा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. या अवैध दारू विक्रेत्याला गावातील ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील सहकार्य करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. अवैध दारू विक्रेत्याला सहकार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा बडतर्फ करण्यात यावे व त्यांच्यावरही उचित कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दोन किलोमीटरवर नांदगाव येथे परवानाधारक देशी चे दारू दुकान आहे. परंतु सरकारी परवानाधारक दुकान असतानाही ठिकठिकाणी दारूचे अड्डे निर्मा...

जुनासुरला येथील देशी दारूचे दुकान बंद करा- गावकऱ्यांची व आजी- माजी पदाधिकाऱ्यांची मागणी! ग्रामसभा घेऊन निर्णय घेण्यासाठी दिले निवेदन

इमेज
जुनासुरला येथील देशी दारूचे दुकान बंद करा- गावकऱ्यांची व आजी- माजी पदाधिकाऱ्यांची मागणी!  ग्रामसभा घेऊन निर्णय घेण्यासाठी दिले निवेदन  - मुल तालुका प्रतिनिधी   दरारा 24 तास न्यूज नेटवर्क  तालुक्यातील जुनासुरला या गावात सरकार मान्य देशी दारूचे दुकान आहे. मात्र हे दुकान सर्व नियमांना धाब्यावर बसवून गडचिरोली जिल्ह्यातही गुप्तपणे दारूची ठोकण विक्री करीत असल्याने व कमी किमतीतील दारू जादा किंमत आकारून विकत असल्याने तळीरामांना आर्थिक भुर्दंड सहन करून शौक पूर्ण करावा लागत आहे. सदर दुकान जिल्हाधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या वेळेत उघडत व बंद होत नसून सकाळी साडे सात ते आठ आणि रात्री बारा वाजता बंद होते. त्यामुळे गावातील आरोग्यास व शाळकरी विद्यार्थ्यांस याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या दुकानाला फक्त किरकोळ दारू विक्री करण्याचा परवाना असताना सदर दुकानातून मोठ्या प्रमाणात ठोक दारू गडचिरोली जिल्ह्यात पाठवली जात असते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  ग्रामपंचायतीने ग्रामसभा आयोजित करून सदर विषयावर चर्चा घडवून आणून हे दारू दुकान बंद...

शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या! आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात मुल तालुक्यात खळबळ

इमेज
शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या! आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात मुल तालुक्यात खळबळ  मुल तालुका प्रतिनिधी  दरारा 24 तास न्यूज नेटवर्क  मूल शहरातील एका शिक्षकाने शाळेतील आवारातील एका झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना दिनांक नऊ नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी सात साडेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली.  योगीराज कुड मेथी असे त्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून राजोली येथील नवभारत शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. या घटनेमुळे मूल शहरात खळबळ उडाली आहे.

बल्लारपूर विधानसभेत संतोष सिंह रावत यांचा जलवा

इमेज
बल्लारपूर विधानसभेत संतोष सिंह रावत यांचा जलवा मुल: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बल्लारपूर विधानसभेत भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र दिसत आहे.  भारतीय जनता पक्षाने राज्याचे वजनदार मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवर यांना उमेदवारी दिली आहे.आणी  ते प्रचारात आघाडी घेऊन आहेत. मात्र काँग्रेस पक्षाने ऐन वेळेवर उमेदवारी वाटपाचा तिढा सोडवला. आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांना उमेदवारी जाहीर केली.  त्यांनी काल शक्ती प्रदर्शन करत मुलं येथील उपविभागीय कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावरून अर्ज दाखल केला. यावेळी संपूर्ण मूल शहर काँग्रेसमय झालेले दिसले. प्रचंड प्रमाणात आलेल्या महिला व पुरुष कार्यकर्ते जोशाने रॅलीत सहभागी झालेले दिसले.  मूलमध्येच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात संतोष सिंह रावत यांच्या कालचा रॅलीची चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी सुद्धा त्यांना समर्थन व सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केल्याचे सूत्रांनी...

बुडून मृत्युमुखी पडलेल्या दिलीप सातपुते यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस नेते संतोष सिंह रावत यांनी घेतली सांत्वन पर भेट

इमेज
बुडून मृत्युमुखी पडलेल्या दिलीप सातपुते यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस नेते संतोष सिंह रावत यांनी घेतली सांत्वन पर भेट दरारा 24 तास न्यूज नेटवर्क मुल: तालुक्यातील दुगाळा येथील ग्रामपंचायत सदस्य व प्रगतशील तरुण शेतकरी दिलीप सातपुते यांचा देवी विसर्जन दरम्यान बुडून मृत्यू झाला. राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते मात्र राजकीय फायदा बघूनच जनतेच्या भेटीगाठी घेतात. इतकी दुर्दैवी घटना घडवून सुद्धा विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून असणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांनी कुटुंबीयांची सांत्वन पर साधी भेट घेतली नाही. परंतु याला अपवाद ठरत काँग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, बल्लारपूर विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे प्रबळ दावेदार, जनतेच्या सेवेत सतत आपले अस्तित्व अर्पण करणारे संतोष सिंह रावत यांनी दिनांक 15 आक्टोबर रोजी मृतकाच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्या समवेत सरपंच प्रीती भांडेकर, माजी सरपंच बनकर गुरुजी, घनश्यामजी येनुरकर, गुरु गुरनूले इत्यादी कार्यकर्ते व गावातील महिला पुरुष उपस्थित होते.

महाविकास आघाडी मुल वतीने उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली

इमेज
महाविकास आघाडी मुल वतीने उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली दरारा 24 तास न्युज नेटवर्क मुल: उद्योगसूर्य रतन टाटा यांचे यांचे छानशी या वर्षी निधन झाले. देशातच नव्हे तर संपूर्ण जगातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि येत आहे.  भारतातील प्रसिद्ध उद्योगपती, सामाजिक कार्यासाठी व सेवेसाठी आपले महत्वपूर्ण योगदान देणारे देशातील पहिले उद्योगपती *स्व. रतनजी टाटा* यांना मुल येथील गांधी चौकात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ वाहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे महासचिव व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, कांग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, शिवसेना (ऊ बा.ठा.) गटाचे मुल तालुका अध्यक्ष प्रशांत गट्टूवार, शहर कांग्रेस सरचिटणीस संदीप मोहबे, विविध कार्यकारी सह.सोसायटीचे संचालक विवेक मुत्यलवार, सौरभ वाढई व कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदगाव चे तलाठी कार्यालय बेवारस-तीन महिन्यापासून तलाठ्याचे दर्शन नाही- शेतकऱ्यांची कामे रखडली!तात्काळ तलाठी नियुक्त करण्याची मधुकर पवार यांची मागणी

इमेज
नांदगाव चे तलाठी कार्यालय बेवारस-तीन महिन्यापासून तलाठ्याचे दर्शन नाही- शेतकऱ्यांची कामे रखडली!तात्काळ तलाठी नियुक्त करण्याची मधुकर पवार यांची मागणी विजय जाधव तालुका प्रतिनिधी  मूल : तालुक्यातील नांदगाव हे गाव बहु चर्चित असून राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. येथील तलाठी साजात अनेक गावे समाविष्ट आहेत. नांदगाव, गोवर्धन, दिघोरी, पिपरी देशपांडे, चेक ठाणा, बोंडाळा बुद्रुक, बोंडाळा खुर्द, देवाळा, जुनगाव इत्यादी गावे समाविष्ट असून नांदगाव येथे ग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये तलाठी कार्यालय आहे. परिसरातील शेतकरी बांधव विविध कामे घेऊन पटवारी कार्यालयात येतात. मात्र येथील तलाठी टेकाम हे अपघातात जखमी झाल्याने बेंबाळ च्या तलाठी महोदयाकडे प्रभार सोपविण्यात आला. परंतु आठवड्यातून एकही दिवस प्रभारी तलाठी कार्यालयात दिसत नसल्याने विविध कामे घेऊन येणाऱ्या जनतेचा व शेतकऱ्यांचा भ्रमनिराश होत आहे. आल्या पावलीच त्यांना परत जावे लागत आहे.  तलाठी कार्यालय असूनही बेवारस अवस्थेत असल्याने जनतेची कामे रखडलेली आहेत. काम असेल तर बेंबाळला या अशी सूचना प्रभारी तलाठी देत असल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

घरासमोर तीन फूट खोल गड्ढा-अपघात होण्याची दाट शक्यता जिओच्या कामातील ठेकेदाराचा मनमानी पणा

इमेज
घरासमोर तीन फूट खोल गड्ढा-अपघात होण्याची दाट शक्यता जिओच्या कामातील ठेकेदाराचा मनमानी पणा  तात्काळ काम करून खड्डा बंद करण्यात यावा  मूल: तालुक्यातील नांदगाव आणि परिसरात जिओ नेटवर्कचे काम चालू असून कंत्राटदारांच्या मनमर्जीने हे काम चालू असून यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. बिना परवानगीने अनेक ठिकाणी गड्डे करून लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. नांदगाव येथील आशिश उमक यांच्या दरवाजाच्या समोरच मोठा गड्डा करून ठेवल्याने लहान मुलं व मोठ्यांचाही अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कंत्राटदारांशी याबाबतीत संपर्क साधून गड्डा बुजवून देण्याची मागणी केली असता कंत्राटदार मगरूळीने उत्तर देत होता. त्यामुळे जिओ वर कोणाचे नियंत्रण आहे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

*जनतेचे आरोग्य उत्तम राहावे, बळीराजा शेतकऱ्याला भरपूर पीक यावे, युवकांच्या हाताला रोजगार मिळावा,महागाई कमी व्हावी,व सर्व सामान्य गोर गरीब नागरिकांच्या घरात सुख - शांती समृद्धी - लाभो

इमेज
*जनतेचे आरोग्य उत्तम राहावे, बळीराजा शेतकऱ्याला भरपूर पीक यावे, युवकांच्या हाताला रोजगार मिळावा,महागाई कमी व्हावी,व सर्व सामान्य गोर गरीब नागरिकांच्या घरात सुख - शांती समृद्धी - लाभो दरारा 24 तास  मुल: कांग्रेस नेते संतोषसिंह रावत यांनी मुल येथील सर्व सार्वजनिक गणरायाला साकडे घालत राज्यातील सर्व शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, बेरोजगार या सर्वांना उत्तम आरोग्य दे, सर्वांना सुख समृद्धी दे तसेच भ्रष्टाचारी सरकारला सद्बुद्धी दे अशी प्रार्थना गणरायासमोर कांग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी जि.प.अध्यक्ष, मुल न.प.चे माजी नगराध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती, श्री.हनुमान मंदिर,मां.दुर्गा मंदिराचे निर्माते जिर्णोद्धार मां.संतोष सिंह रावत यांनी दोन दिवसात मुल येथील सर्व सार्वजनिक गणेश मंडळाने स्थापन केलेल्या विघ्नहर्त्या श्री.गणरायाचे दर्शन घेऊन, आरती करून मनोभावे साकडे घातले.  गणेश मंडळाच्या सदस्यांना, वॉर्डातील समस्त नागरिकांना, महिलांना बाल गोपाला यांना भरभरून शुभेच्छा दिल्या, त्यांचे समवेत कृषी बाजार समिती सभापती राके...

मुल तालुक्यात इसमाची आत्महत्या-गुढ कायम!

इमेज
मुल तालुक्यात इसमाची आत्महत्या-गुढ कायम! दरारा 24 तास न्युज नेटवर्क मूल: तालुक्यातील चितेगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल पहाटे चार वाजताचे दरम्यान उघडकीस आली. राहुल मंदावार वय 40 वर्ष असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. मृतक राहुल मंदावार हा डब्लू.सी. एल. दुर्गापूर येथे कार्यरत होता. काही दिवसापासून तो चितेगाव येथील आजोबाकडे राहत होता. आजी आजोबा हे बाहेरगावी गेले होते. राहुल हा घरी एकटाच असल्याने घरी कोणी नसल्याची संधी साधून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमकं कारण कळू शकले नाही. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत. घटनेची माहिती होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. लगेच ही माहिती मूल पोलीसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.

महायुती सरकारच्या "लाडकी बहीण' फसवी योजनेची अखेर पोलखोल - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

इमेज
*महायुती सरकारच्या "लाडकी बहीण' फसवी योजनेची अखेर पोलखोल - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार*    *खाद्यतेलाच्या सीमा शुल्कात प्रचंड वाढ -  बहिणीच्या चुलीवरील फोडणी महागली*    दरारा 24 तास न्युज नेटवर्क  चंद्रपूर: राज्यातील महिलांचे आर्थिक मजबुतीकरण करण्याचा खोटा गाजावाजा करून राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकसभा निवडणुकीतील  मतांच्या झालेल्या कडकीमुळे लाडकी बहीण योजना अमलात आणली. राज्याच्या तिजोरीत ठणठणाट असताना केवळ सत्ता प्राप्तीसाठी महायुतीने चालविलेला हा केविलवाणा प्रयत्न अखेर सपेशल अपयशी ठरला असून काल रात्रीपासून खाद्य तेलाच्या सीमा शुल्कात केलेल्या प्रचंड वाढीमुळे राज्य सरकारच्या "लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा निघाल्याची खरमरीत टीका  खाद्यतेलाच्या प्रचंड भाव वाढीवरून महायुती सरकारचा खरपूस समाचार घेत राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मतदारांनी गेल्या दहा वर्षाचा भाजप सरकारच्या कारकिर्दीचा आढावा लक्षात घेऊन मतदान केले. यात देशातील वा...