रीतीकच्या हत्येमुळे मूल शहरात तणाव; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, अरोपीला अटक
मूल तहसील कार्यालयासमोर रितिक शेंडे (२८) या युवकाची शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास तीन ते चार युवकांनी हत्या केली.
दरारा 24 तास न्युज नेटवर्क
चंद्रपूर
आरोपींनी चाकूने वार करून रितिकला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत असलेल्या रितिकला येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ आगडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी रितिकला मृत घोषित केले.
विशेष म्हणजे शहरात तीन महिन्यातील ही दुसरी हत्येची घटना आहे.
चंद्रपूर : मूल तहसील कार्यालयासमोर रितिक शेंडे (२८) या युवकाची शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास तीन ते चार युवकांनी हत्या केली. शहरात तीन महिन्यातील ही दुसरी हत्येची घटना आहे. शुक्रवारी रात्री मूल पोलीस ठाण्यात नागरिकांनी एकत्र येत आरोपींच्या अटकेची मागणी लावून धरली. शनिवारी शवविच्छेदनानंतर संतप्त नागरिकांनी मूल तहसील आणि पंचायत समितीजवळील घटनास्थळी मृतदेह ठेवून चक्काजाम आंदोलन केले. यामुळे चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील वाहतूक खोळंबली. दरम्यान, शहरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी आरोपी राहुल पासवान याच्यासह तीन आरोपींना अटक केली आहे, तर अन्य फरार आहेत.
मूल तहसील कार्यालयासमोर नगर पालिकेने उभारलेल्या बस थांब्यात रात्री दहा वाजताच्या सुमारास रितिक बसून होता. तीन-चार युवक तेथे आले आणि त्याच्याशी वाद घातला. या वादाचे पर्यावसण हाणामारीत झाले. आरोपींनी चाकूने वार करून रितिकला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला रितिक आरडाओरड करित होता. त्याच वेळी काही नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतले. मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. कुटुंबीय, समाज बांधव, नागरिकांनी घटनास्थळी आणि पोलीस ठाण्यात गर्दी केली. शनिवारी सकाळपासूनच उपजिल्हा रुग्णालयात स्थानिक नागरिकांची आणि कुंटुंबीयाची गर्दी झाली होती. आरोपींना अटक करा, अशी मागणी जमावाने केली. रितिकची हत्या कोणत्या कारणासाठी झाली, याचा अद्याप उलगडा होवू शकला नाही. पुढील तपास वरिष्ठ पातळीवर सुरू आहे.
0 Comments