काय आहे प्रकरण जाणून घेण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.. चला तर जाणून घेऊया बातमीची रूपरेषा...
संतोष गोंगले, (तालुका प्रतिनिधी)
मुल: गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पामुळे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील अनेकांना आपले जीवन गमवावे लागले आहे. सुरजागड लोह प्रकल्पातून अवजड ट्रक भरधाव वेगाने धावत असल्याने पर्यायी रस्ता तयार करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी अनेकदा केली. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. अहेरी-अल्लापल्ली येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून पर्यायी रस्त्यासाठी आंदोलन केले होते. तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे अपघाताची शृंखला वाढतच जात आहे.गोंडपिपरी ते खेडी या महामार्गावरून ही वाहतूक सुरू झाली असल्याने या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावर सुद्धा या ट्रकांच्या अपघातात काही जणांचे जीव गेले काही दिवसापूर्वीच चांदापूर क्रॉसिंग वर एका परिचारिकेला या वाहनांनी चिरडले होते.या रस्त्यावरून शुक्रवारी नांदगाव येथील शेतकरी ईश्वर मांदळे या शेतकऱ्याच्या बैलास ट्रकने धडक दिली. त्यात सुदैवाने बैलाचा जीव वाचला असला तरी त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे जवळपास 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. अपघात घडताच संबंधित शेतकऱ्याने ट्रकला अडवून चाबी काढून त्याला बस स्थानक परिसरात बोलावले. त्यावेळी महामार्ग पोलीस सुद्धा उपस्थित होते. शेतकऱ्याला मोबदला म्हणून केवळ चार हजार रुपये देऊन त्याची समजूत काढली. मात्र शेतकरी हा संतप्त झाला होता. एवढी घटना घडूनही केवळ चार हजार रुपये देऊन आपले पाय झटकले असा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित शेतकऱ्याला समाधानकारक मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकरी ईश्वर मांदळे व नागरिक यांनी केली आहे.
सुरजागड प्रकल्पातील अवजड वाहनांमुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागतो.त्यामुळे या प्रकल्पाला अहेरी उपविभागातील अनेक गावांचा प्रचंड विरोध आहे. तसेच वाहतूक होणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांचा या वाहतुकीला तीव्र विरोध आहे. या मार्गावरून होणारी अवजड वाहतूक ही बंद करण्यात यावी अशी मागणी जुनगावचे सरपंच राहुल भाऊ पाल, माजी सरपंच तथा शिवसेनेचे तालुका उपप्रमुख जीवनदास गेडाम यांनी केली आहे.
0 Comments