जिओच्या कामातील ठेकेदाराचा मनमानी पणा
तात्काळ काम करून खड्डा बंद करण्यात यावा
मूल: तालुक्यातील नांदगाव आणि परिसरात जिओ नेटवर्कचे काम चालू असून कंत्राटदारांच्या मनमर्जीने हे काम चालू असून यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. बिना परवानगीने अनेक ठिकाणी गड्डे करून लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. नांदगाव येथील आशिश उमक यांच्या दरवाजाच्या समोरच मोठा गड्डा करून ठेवल्याने लहान मुलं व मोठ्यांचाही अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कंत्राटदारांशी याबाबतीत संपर्क साधून गड्डा बुजवून देण्याची मागणी केली असता कंत्राटदार मगरूळीने उत्तर देत होता. त्यामुळे जिओ वर कोणाचे नियंत्रण आहे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
0 Comments