Ticker

6/recent/ticker-posts

घोसरी येथील प्रादेशिक योजनेचा पाणी पुरवठा ठप्प --------------------------------------- जल जीवन मिशन योजनाही रखडली : महिलांची भटकंती ------------------------------------------ प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे उपसरपंच तथा भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ते जितू भाऊ चुधरी यांची मागणी

घोसरी येथील प्रादेशिक योजनेचा पाणी पुरवठा ठप्प
---------------------------------------
जल जीवन मिशन योजनाही रखडली : महिलांची भटकंती
------------------------------------------


प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे उपसरपंच तथा भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ते जितू भाऊ चुधरी यांची मागणी 


जिवनदास गेडाम (विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर :  येथील प्रादेशिक पाणी पुरवठा गेल्या दोन महिण्यापासून बंद पडलेलीआहे. तद्वतच जल जीवन मिशन योजनेअंतर्गत वाढीव पाणी पुरवठ्याकरीता पाईप लाईनकरीता रस्त्याच्या मधोमध खोदकाम केलेले काम रखडलेले असल्याने नागरिकांना मार्गक्रमण करणे कसरतीचे झाले आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा शुध्द पाणी पुरवठा बंद असून महिलांना भटकंती करावी लागत असल्याने संताप पसरलेला आहे. प्रशासनाने गांभीर्याने दखल घेवून उपाययोजना करावी अशी मागणी उपसरपंच जितुभाऊ चुदरी यांनी केली आहे.
       
        बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत घोसरी येथील पाणी पुरवठा प्रशासन व कंत्राटदार यांच्या दुर्लक्षीतपणामुळे अनेकदा बंद पडत असते. एवढेच नव्हे तर संपूर्ण गावाला पाणी पुरवठा होत नसल्याने जल जीवन मिशन योजनेच्या वाढीव पाणी पुरवठ्याला मंजूरी मिळाली. त्यामुळे मागील वर्षी टाकीचे बांधकाम करण्यात आले. आणि वाढीव पाईप लाईनकरीता कंत्राटदारानी सिमेंट रस्त्याच्या मधोमध खोदकाम केल्याने सिमेंट रस्ते क्षतिग्रस्त झाल्याने मार्गक्रमण करणे कसरतीचे झालेले आहे. 
       
       संबंधीत कंत्राटदार पाईप लाईन टाकण्याच्या कामाला गती देत नसून क्षतिग्रस्त सिमेंट रस्ते दुरुस्तीकडे  पाठ फिरवलेली आहे. परिणामी नागरिकांमध्ये मनस्ताप पसरलेला आहे. नागरिकांना शुध्द पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. परंतू या ना त्या कारणाने सलग पाणी पुरवठा होत नसुन वर्षभरात किमान ३ महिणेही पाणी पुरवठा झाला नसल्याची येथील नागरिकांची ओरड आहे.     
                  शुध्द पाण्याअभावी येथील नागरिकांना अन्य स्तोत्रातील अशुध्द पाण्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने सतत बंद पडणाऱ्या योजनेला दुरुस्त करावे अशी मागणी ग्रामवासीय आणि उपसरपंच यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments