Ticker

6/recent/ticker-posts

धान कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट व फसवणूक - जुनगाव येथे सापडले वजन काटा नियंत्रण करणारे रिमोट - व्यापाऱ्याला रंगेहात शेतकऱ्यांनी पकडले,,




पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी
===========================
तालुक्यातील शेतकऱ्यांचा धान, कापूस खाजगी व्यापारी थेट गावातच येऊन विकत घेत आहेत. त्यांचे वजन काटे अधिकृत की अनधिकृत आहेत याचे कोणतेही मूल्यमापन नाही. धान व कापूस आणि इतर कटान खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर शेतकऱ्यांचा आंधळा विश्वास आजही आहे. परंतु यातून शेतकऱ्यांची फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. वजन काटा करणारी माणकी खरोखरच त्या वजनाची असतात का किंवा तानकाट्याने मोजल्या जाणारा कापूस बरोबर वजनाने खरेदी केला जातो का? इलेक्ट्रॉनिक काटा सुद्धा त्यांचा बरोबर आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहेत. या व्यापाऱ्यांवर कोणाचेच वचक नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी जुनगाव येथे तर जणू हैदोस घातला आहे.
  इलेक्ट्रिक काट्याला नियंत्रित करून वजन कमी करणारे यंत्र अर्थात रिमोट उपलब्ध झाले असून या रिमोटच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. आणि आर्थिक लूट केली जात आहे.
        याचे ज्वलंत उदाहरण तालुक्यातील जुनगाव येथे दि.16 फेब्रुवारी रोजी उघडकीस आले. रिमोटने वजन कमी करत असताना शेतकऱ्याने व्यापाऱ्याला रंगेहात पकडले.आणि गावातील लोकांना एकत्र केले. अविनाश चरणदास टीकले राहणार जाम तुकूम असे या व्यापाऱ्याचे नाव आहे.
ही मनस्ताप घडवून आणणारी घटना आज दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी घडली. जुनगाव येथील शेतकरी किशोर देशमुख यांनी आपले धान विक्रीसाठी काढून या व्यापाऱ्याला काटा करण्यास बोलाविले. कृषी उत्पन्न बाजार समितीने पाचपटीने शेष वसूल केला असून पुढील कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
घटने संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली असून वृत्तलीहे पर्यंत पोलीस घटनास्थळावर उपस्थित झाले नव्हते.
       आठवडाभरापूर्वीच याच शेतकऱ्याच्या घरी धान खरेदी करताना बेंबाळ येथील रमेश ऊराडे हा व्यापारी रिमोटने वजन काटा नियंत्रित करीत असताना सापडला. त्यालाही गावात फायनान्शिअल कारवाई करून सोडून देण्यात आले होते. त्यामुळे अधिकच हिम्मत वाढलेल्या व्यापाऱ्यांनी या नवीन शकलेचा उपयोग करून शेतकऱ्यांना लुटण्याचा सपाटा चालवलेला आहे.

Post a Comment

0 Comments