: विभागीय चौकशी करण्याची उपसरपंच सागर देऊरक यांची मागणी
दरारा 24 तास न्युज नेटवर्क
मूल: पंचायत समिती, मूलअंतर्गत ग्रामपंचायत, नांदगाव येथे कार्यरत असताना ग्रामसेवक शैलेश सहारे यांनी घरकुल लाभार्थी निवड यादी तयार करताना अनियमितता करून कर्तव्यात कसूर केल्याचे चौकशी अहवालावरून दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४चे ६ नुसार शिस्तभंगविषयक कार्यवाहीस पात्र ठरल्याने जिल्हा परिषद, चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी ग्रामसेवक शैलेश रामचंद्र सहारे यांना सेवेतून निलंबित केले आहे.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायत, नांदगाव येथे कार्यरत असताना घरकुलासाठी गरजू लाभार्थीना डावलून ग्रामसेवक शैलेश रामचंद्र सहारे यांनी यादीत हेराफेरी करून गरजू लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. ही बाब ग्रामपंचायतीचे उपसरपंच सागर देऊरक व इतर सदस्यांना माहीत होताच त्यांनी गटविकास अधिकारी मूल व मुख्य कार्यपालन अधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली.
यासंदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशीअंती ग्रामसेवक शैलेश रामचंद्र सहारे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आल्याने आदेश क्रमांक / पंचायत / विचर्चा / टे-३ / २११४ / २०२४ दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ अन्वये निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत मुख्यालय पंचायत समिती, राजुरा येथे त्यांची नियुक्ती निश्चित करण्यात येत असल्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
सेवेत सामावून घेऊ नये-सागर देऊरकर
पात्र घरकुल लाभार्थीना डावलल्याने अनेक लाभार्थी घरकुलापासून वंचित झाले होते. त्यामुळे अनेकांनी ग्रामसेवकांविषयी रोष व्यक्त केला असून, त्यांना सेवेत सामावून घेऊ नये. सेवेत घेतल्यास सवय जडलेल्या या व्यक्तीकडून असाच घोळ होऊन अनेक गरिबांच्या घरकुलांवर संक्रात येईल, अशी भीती ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
घरकुल निवडयादीत घोळ करण्यात आला. त्यामुळे अनेकांना घरकुलापासुन वंचित ठेवण्याचा प्रयत्न ग्रामसेवक शैलेश सहारे यांनी केला. याबाबत तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. याबाबत वेळोवळी पाठपुरावा केल्यानंतर मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर यांनी निलंबित केले आहे.
===================
खऱ्या घरकुल लाभार्थीना वंचित ठेवणाऱ्या अशा ग्रामसेवकाला पुन्हा सेवेत न घेता त्याची विभागीय चौकशी करण्यात यावी.
-सागर देउरकर, उपसरपंच, नांदगांव
0 Comments