रवि मरपल्लीवार यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला काहीच फरक पडणार नाही-
विनोद अहिरकर माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे वक्तव्य
पोंभुर्णा: रवि मर्पलीवार यांना सरपंच पदापासून ते काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पर्यंत व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी तसेच सेवा सहकारी संस्था च्या अध्यक्षपदी बसवून देण्याचे काम आम्ही केलेले आहे. याची जाणीव रवी मरपलीवार यांनी विसरली आहे. त्यांचा नकाब आम्ही नक्कीच उतरवू अशा संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांनी रवि मरपल्लीवार यांच्या भाजप प्रवेशावर दिल्या आहेत.
रवींद्र मरपलीवार हे काँग्रेसचे तालुक्यातील नेते म्हणून वावरत होते. काँग्रेसचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशा पदावरचे कार्यरत होते .काँग्रेसने त्यांना काही कमी केलेले नाही. असे असताना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे. असे जाहीर झाल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. रवींद्र मरपल्लीवार हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून वावरत होते. परंतु अचानक त्यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे कार्यकर्त्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. मात्र कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाशी एकनिष्ठ असून प्रतिभा धानोरकर यांच्या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न करीत त्यांच्या एकट्या जाण्याने पक्ष थांबतो की काय अशा भूमिकेत त्यांनी वावरू नये.या पार्श्वभूमीवर अहीरकर यांची प्रतिक्रिया विनोद भाऊ आहेरकर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष यांची प्रतिक्रिया घेतली असता रवि मरपल्लीवार यांच्या जाण्याने काँग्रेसच्या निवडणुकीवर काही फरक पडणार नाही. असे विनोद अहिरकर यांनी केलेले आहे.
काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर या निवडून येणारच आहेत अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे.
रवी मर्पलीवार यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणू, निवडणूक संपल्यानंतर त्यांचा खरा चेहरा दाखवण्यासाठी आम्ही पुढे येऊ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद सुद्धा धोकाधडी करूनच घेतलेले आहे. कारण त्यांची कुठेच शेती नाही. सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष पद सुद्धा बेकायदेशीर रित्या घेतलेले आहे. या संस्थांमध्ये निवडणुकीत सहभागी होण्यासाठी शेतकरी असणे आवश्यक आहे. मात्र रवी मर्पलीवार यांच्या नावे कुठलीच शेती नसताना ही दोन्ही पदे त्यांच्याकडे आहेत हे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी हेरले. त्यांच्या देशी दारूचे दुकान सुद्धा बोगस कागदपत्र दर्शवून चालू आहे. घरमालकाचे प्रमाणपत्र सुद्धा खोटे आहे. सातबारा वर पाच जणांची नावे आहेत. एन ए केल्याशिवाय घर बांधकामास परवानगी मिळत नाही. या सर्व बाबी सुधीर मुनगंटीवार यांनी हेरल्या आणि त्यांना अडचणीत पकडले. त्यामुळे व पैशाच्या लालसे पोटी त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाशी दगाबाजी केली. याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असेही अहिरकर यांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्या जाण्याने कुठलाच फरक पडणार नाही त्यांच्या पाठीमागे कसलाही जनाधार नाही.
0 Comments