Ticker

6/recent/ticker-posts

वडिलांना 'टकल्या' म्हणल्याचा राग; मुलाच्या संतापाचा कडेलोट, रागाच्या भरात एकाला संपवलं


वडिलांना 'टकल्या' म्हणल्याचा राग; मुलाच्या संतापाचा कडेलोट, रागाच्या भरात एकाला संपवलं
==============
दरारा 24 तास न्युज नेटवर्क 

पुणे:किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाने एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केलाय. वडिलांना 'टकल्या' म्हणल्याच्या राग आला आणि अल्पवयीन आरोपीच्या संतापाचा कडेलोट झाला. संतापलेल्या आरोपीने एकाचा दगडाने ठेचून खून केलाय. ही घटना वाघोली परिसरात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडलीये. दारुच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने वडिलांना टकल्या म्हटल्याचा राग आल्याने या अल्पवयीन मुलाने हा खून केलाय. राजू लोहार (वय 46) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments