नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू
नांदगाव: विजय जाधव
मुल: नांदगाव कडून गोंडपिपरीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचा गोवर्धन स्मशानभूमी वळणावर अपघात झाल्याने या अपघातात फोन लाईनचे काम करणारे सुपरवायझर सागर मिश्रा वय 25 रा.नागपूर यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली.घटनेची माहिती बेंबाळ पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील कारवाई प्रशांत गायकवाड मेजर व त्यांचे सहकारी करत आहेत.
0 Comments