दिवाळीच्या पर्वावर खांबावर लाईन मनचा दुर्दैवी मृत्यू
पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी
सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू आहे. या दिवाळीच्या धामधुमीत सर्वच लोक आपापल्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतात. दिवाळी म्हणला की दिव्यांचा सण, प्रकाशमय झगमगाट असायला हवा अशी या दिवाळीची ओळख आहे. या सणांमध्ये कुठल्याही गावातील वीजपुरवठा सुरळीत असावा बंद पडू नये म्हणून महावितरणचे लाईनमन सतत कार्यरत असतात. अशातच आज दिनांक 22 ऑक्टोबर 2022 रोजी तालुक्यातील चेक हत्तीबोडी येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी दिपक पेंदाम हे लाईनमन पोलवर चढले. यावेळेस मात्र वीज पुरवठा सुरू असल्यामुळे विजेचा जोरदार करंट लागून लाईनमन चा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात दिवाळीच्या सणावर प्रकाशा ऐवजी काळोख पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दिवाळीला सर्वत्र प्रकाशमय सण म्हणून प्रकाशासाठी महावितरण चे कर्मचारी सतत प्रयत्नशील असतात. मात्र अधिकाऱ्यांच्या ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभारामुळे काम करणाऱ्या फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बळी जात आहे. अशा घटना अनेकदा घडलेल्या असताना सुद्धा महावितरणने याकडे अजिबात दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे.
आज दिनांक 22 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळीचा प्रकाश लोकांना पोहोचण्याच्या कामाकरिता लोकांना प्रकाश देण्याच्या नादात स्वतःच अंधारात गेला. याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. घटनास्थळावर पोलीस अधिकारी, एम एस ई बी चे अधिकारी दाखल झाले आहेत. पुढील कारवाई सुरू आहे मात्र, 26 लाख रुपये आणि एक कुटुंबातील व्यक्तीला नोकरी या अटीवर नातेवाईक अडलेले आहेत. आणि ते योग्यही आहे. मोठ्या अधिकाऱ्यांनी येऊन त्यांना जर आश्वासन दिले नाही, तर हा सवविच्छेदनासाठी प्रेत पाठवल्या जाणार नाही, अशी शोकग्रस्त कुटुंबीयांची मागणी आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आताच्या क्षणाला खांब्यावरून मृत लाईन मला खाली उतरवण्यात आले असून त्याचा पोलीस पंचनामा सुरू आहे. पुढील माहिती मिळाल्यानंतर लगेच पब्लिश करण्यात येईल.
0 Comments