Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीत दिव्यांग वृद्धाची शस्त्राने निघृण हत्या। अज्ञात आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू।

आष्टीत दिव्यांग वृद्धाची शस्त्राने निघृण हत्या।


अज्ञात आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू।

गडचिरोली। (विकास रामटेके,विशेष प्रतिनिधि)

किरायाच्या घरात राहत असलेल्या दिव्यांग वृद्धाची अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. ही धक्कादायक घटना १५ डिसेंबरला उघडकीस आल्यानंतर आष्टीसह संपूर्ण परिसर हादरला आहे, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. रशीद अहमद शेख (६०, रा. बुटीबोरी, नागपूर) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

रशीद शेख हे पायाने दिव्यांग होते. ते २० वर्षांपासून आष्टी येथे किरायाची खोल्वे घेऊन वास्तव्यास होते. त्यांनी १२ डिसेंबर रोजी नातेवाइकांना दूरध्वनीद्वारे गावाकडे येत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर चारपाच दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर त्यांचा फोन लागत नसल्याने नातेवाइकांना शंका येऊ लागली. त्यामुळे शेख यांचे नातेवाइक नागपूरवरून आष्टी येथे आले. त्यांचा फोटो दाखवून हा व्यक्ती कुठे राहतो, अशी विचारणा करू लागले. तेव्हा आष्टी येथील चौकातील काहींनी चामोर्शी मार्गावरील खुशाल कुकडकर यांच्या घरी किरायाने राहत असल्याची माहिती नातेवाइकांना दिली. त्यानंतर नातेवाइकांनी कुकडकर यांचे घर गाठले असता त्यांना घराला कुलूप लावल्याचे निदर्शनास आले. खिडकीतून डोकावून बघितले असता त्यांना खोलीत रक्ताच्या थारोळ्यात शेख पडलेल्या अवस्थेत दिसले.नातेवाइकांनी लागलीच बाची माहिती देण्यासाठी आष्टी पोलीस ठाणे गाठले, पोलिसांनी घटनास्थळ गाठून घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. पोलिसांना शेख रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडून असल्याचे दिसले. रशीद शेख यांची हत्या चारपाच दिवसांपूर्वीच झाली असावी. मृतदेहाला दुर्गंधी सुटली होती. त्यानंतर पोलिसांनी अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पाचारण केले. उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी घराच्या सभोवताल फिरून चौकशी केली. शेख यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. रशीद शेख यांच्या हत्येमुळे आष्टी परिसरात खळबळ उडाली असून अद्याप आरोपींचा पत्ता लागला नसला तरी आष्टी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments