Ticker

6/recent/ticker-posts

लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या शिक्षकाला तात्काळ निलंबित करा-माजी जि प अध्यक्ष विनोद अहिरकर

लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या शिक्षकाला तात्काळ निलंबित करा-माजी जि प अध्यक्ष विनोद अहिरकर


विजय जाधव प्रतिनिधी,

नांदगाव: येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यास लोखंडी रॉडने मारहाण केल्याची समताप जनक घटना घडली. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहीरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

नांदगाव येथे जिल्हा परिषद हायस्कूल आहे. या शाळेतील सहायक शिक्षक मनोज आगलावे यांनी बुधवार (ता. १८) दुपारच्या सुटीत सातवीच्या वर्गात प्रवेश केला. वास्तविक वर्ग सात मध्ये आगलावे यांचा कसलाही रोल नाही. तरी सुद्धा त्यांनी वर्गात जाऊन लोखंडी रॉडने वर्गातील मुलांना मारहाण केली. त्यात सुमित दिलीप शिंदे या विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागला. मंजित रोशन भंडारे या विद्यार्थ्यालाही इजा झाली. मनोज आगलावे यांनी यापूर्वी शाळेतील नयन नायगमकार यालाही मारहाण केली होती. याप्रकरणात मुख्याध्यापकांनी आगलावे यांच्यावर कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी, केंद्रप्रमुख कोपुलवार यांनी शाळेला भेट दिली. यादरम्यान शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षक आगलावे यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली.

वर्ग सातवीचा मनोज आगलावे यांच्याशी संबंध नाही. असे असतानाही त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप विनोद अहीरकर यांनी केला आहे. मनोज आगलावे यांच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही अहीरकर यांनी दिला आहे. प्रकरण कोणते वळण घेते याकडे नांदगाव वासियांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments