भोकर तालुक्यातील चिदगिरी येथील जि प शाळेमध्ये बालविवाह प्रतिबंध मार्गदर्शनपर पालक मेळावा आयोजित करण्यात आला जी नांदेड येथील युनिसेफच्या वतीने एनजीओ मार्फत बालविवाह प्रतिबंध कायदे विषयी सखोल मार्गदर्शन एनजीओ या संघटनेच्या सो अशा वळवी मॅडम सो सविता गायकवाड मॅडम व श्री कृतीलाल वळवी सर यांनी उपस्थित राहून बहुसंख्य नागरिकांना दोन सत्रात मार्गदर्शन केले एक सत्र महिला व पुरुष नागरिकांना व दुसऱ्या सत्रामध्ये पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले विविध साहित्याच्या माध्यमातून गीतातून उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि प शाळेचे मुख्याध्यापक अवधाने सर प्रमुख पाहुणे म्हणून अवधूत गिरी पत्रकार प्रतिनिधी गोविंद गिरी उपसरपंच प्रतिनिधी सुधाकर कंदेवाड दत्ता जाधव संतोष चव्हाण संजय कदम गावातील असंख्य नागरिक बचत गटातील महिला अंगणवाडी सेविका गावातील सामाजिक कार्यकर्ते विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments